वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील मोका मधील पाहिजे आरोपी जेरबंद

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन कडील मोका मधील पाहिजे आरोपी जेरबंद
दि.०४/०६/२०२५ रोजी पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना त्यांच्या गोपनीय बामतीदारामार्फत बातमी मिळाली की, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं ४२४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम चे कलम १०९,१११,१५१ (३),१८९(१),१८९(२).१८९(४),१९०,१९१ (३),३ (५), आर्म अॅक्ट कलम ४ (२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंड कायदा कलम ७ मपोका ३७ (१), (३) सह १३५ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (), ३(२) व ३(४) प्रमाणे मोका गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे रोहन राजेश धिवार वय २२ वर्षे रा. वडगाव धायरी पुणे. हा स्वारगेट एसटी स्टैंड जवळ आला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी त्यांनी जावुन आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले असुन आरोपीने गुन्हयाची कबुली दिली असुन त्याची वैदयकीय तपासणी करुन पुढील कारवाईसाठी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले.
 
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रंगराव पवार, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, परि. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हंस, सुरेश पाटील, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे व चालक सुजीत पवार यांनी केली आहे