पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
 पनवेल, दि.05: जागतिक पर्यावरणाचे जतन करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने एक लक्ष  वृक्षारोपणासाठी उचललेले  पाऊल हे निश्चितच अभिनंदनीय व पनवेलच्या सौंदर्यात भर घालणारेच आहे. त्यामुळे पनवेल शहर अधिकाअधिक सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आपण नागरिकांनीही  कटिबध्द व्हावे,असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. 
         महानगरपालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरणदिनानिमित्ताने वडाळे तलावाजवळील महामार्गालगत सुमारे 40 झाडांचे रोपण करण्यात आले. तसेच  कापडी पिशवी विक्री केंद्र आणि पुर्नवापर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन केंद्राचे ही उद्घाटन करण्यात आले , यावेळी ते बोलत होते.
    पुढे बोलताना श्री.ठाकूर म्हणाले, कापडी पिशवी साठीची आधुनिक मशीन व ई-वेस्ट कचरा संकलन या महत्त्वाच्या बाबीही पनवेल मनपाने सुरू केले आहेत. त्याचा उपयोग पनवेलकरांनी अधिकाधिक करावा व पर्यावरणाचे रक्षण करावे.
 
      यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर,अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे,उपायुक्त सर्वश्री, डॉ.वैभव विधाते, रविकिरण घोडके, स्वरूप खारगे, परिवहन उपव्यवस्थापक अभिषेक पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, शहर अभियंता संजय कटकेर, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे,सहाय्यक आयुक्त सर्वश्री श्रीराम पवार , डॉ.रूपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण,मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, माजी नगरसेवक सर्वश्री  नितिन पाटील, अजय बहिरा, अनिल भगत व माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज, सुरेखा मोहकर, वृषाली वाघमारे,  विभाग प्रमुख अनिल कोकरे,महापालिका अधिकारी ,महावीर इंटरनॅशनल संस्थेचे पदाधिकारी, निसर्गमित्र संस्थेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
 
माजी सभागृहनेते परेश ठाकूर
 यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर म्हणाले,  प्लास्टिकमुक्तीसाठी महापालिकेने कापडी पिशवी वेडिंग मशीन बसविली आहे. हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या बरोबर महापालिकेने 1 लाख झाडे लावण्याचा उत्तम  निर्धार केला आहे. महापालिकेने याबाबत  केलेले नियोजन पहाता हा उपक्रम यशस्वीपणे राबवल्या जाईल यात शंका नाही 
   यावेळी कापडी पिशवी विक्री मशीन व पुर्नवापर प्लास्टिक व ई वेस्ट संकलन केंद्र याबाबत उपयुक्त  डॉ. वैभव विधाते यांनी सविस्तर माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी  पर्यावरण रक्षणाबाबत  हरित शपथ घेण्यात आली.
 
पर्यावरण दिनी 1100 वृक्ष लागवड
बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आयुक्त  मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार पनवेल महानगरपालिकेने व्यापक वृक्षारोपण मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध ठिकाणी एक लाखाहून अधिक झाडे लावण्याचा निर्धार केला आहे. याची सुरूवात  पर्यावरण दिनानिमित्ताने महापालिकेच्या चारही प्रभागात 1100 झाडांचे रोपण करून करण्यात आली. 
      यात आयटीआय कॉलेज, जेसल मेलोडी,पनवेल बसस्टॅन्ड याठिकाणी 160  वृक्षांचे रोपण करण्यात आले.
 
प्रभाग समिती ब
    महानगरपालिका, प्रभाग समिती ब, प्रभाग क्रमांक ७ येथील सेक्टर २०, रोडपाली मैदान येथे १०० झाडे लागवड करण्यात आली. याचबरोबर खांदा कॉलनी शंकर तलाव येथे 50 झाडे, फोनिक्स बँक्वेट हॉल शेजारी 100 झाडांचे रोपण करण्यात आले.या वेळी पनवेल महानगरपालिका उपायुक्त स्वरूप खारगे , सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार ,प्रभाग समिती (ब) अधिक्षक मनोज चव्हाण , माजी नगरसेवक ,  नगरसेविका रोडपाली असोसिएशन , लायन्स क्लबच्या मेंबर, पर्यावरण बचाव समितीचे सदस्य, पनवेल महानगरपालिका इंजिनियर, प्रभाग समिती ब सर्व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. 
नावडे उप विभाग
 महानगरपालिकेमार्फत अमृत 2.0 आणि डे एन यु एल एम कृतीसंगम कार्यक्रमाअंतर्गत पिसार्वे तलाव येथे बचत गटातील महिलांमार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बचत गटांतील महिलांमार्फत 140 झाडे लावण्यात आली.
    या कार्यक्रमासाठी उपायुक्त अभिषेक पराडकर, उपायुक्त मंगला माळवे, उपअभियंता विलास चव्हाण , सहाय्यक आयुक्त डॉ. रूपाली माने , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र म्हात्रे , प्रभाग अधिकारी नावडे अरविंद पाटील, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी , अधिक्षक नामदेव पिचड तसेच डे एन यु एल एम व्यवस्थापिका विनया म्हात्रे,  पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.  
 
कामोठे प्रभाग (क)
कामोठेमधील सेक्टर 8 व सेक्टर 6 याठिकाणी उपायुक्त रविकिरण घोडके  व माजी नगरसेवक यांच्या हस्ते सुमारे 140 हून अधिक झाडे लावण्यात आली.
 
खारघर प्रभाग (अ)
खारघरमधील सेक्टर14 व सेक्टर 30मध्ये  उपायुक्त अभिषेक पराडकर व  माजी नगरसेवक यांच्या हस्ते सुमारे 130 हून अधिक झाडे लावण्यात आली. खारघरमधील विविध उद्यानांमध्ये50 व तळोजा मधील गणेश विसर्जन घाट येथे 50,सिडको कार्यालयाजवळ 40 वृक्ष लागवड करण्यात आली.
                   ..........