पनवेल महापालिकेच्या शिबिरात ४८ जणांचे रक्तदान

पनवेल महापालिकेच्या शिबिरात ४८ जणांचे रक्तदान

१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेवा संकल्प अभियानांतर्गत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर प्रमिला रवीनाथ पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता प्रितम म्हात्रे आणि प्रभाग समिती अचे सभापती रवींद्र भगत उपस्थित होते. यावेळी महापालिका सदस्य सरस्वती काथारा, मोनिका महानवर, योगिता फडके, मनाली ठाकूर आणि बायजा बारगजे यांनीही उपस्थिती दर्शविली.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, क्षयरोग अधिकारी डॉ. उषा राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. मनिषा चांडक, डॉ. सुरेश पंडित आणि डॉ. भक्तराज भोईटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही शिबिराच्या आयोजनात सहभाग घेतला.

पुढील रक्तदान शिबिरे

९ ऑक्टोबर रोजी प्रभाग क अंतर्गत प्रभाग समिती कार्यालय, कामोठे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर १० ऑक्टोबर रोजी प्रभाग ब अंतर्गत खारघर सेक्टर १५ येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात रक्तदान शिबिर होणार आहे.