विजय चौधरी यांची मालेगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट

विजय चौधरी यांची मालेगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट
विजय चौधरी यांची मालेगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांशी सदिच्छा भेट

(विशेष प्रतिनिधी : सौ. रूपाली मनोज बैसाने)

मालेगाव : धुळे येथे तेली समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्याला उपस्थिती लावल्यानंतर मुंबईकडे परतत असताना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, उत्तर महाराष्ट्र समन्वयक तथा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी मालेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव सदिच्छा भेट दिली.

यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. सर्वांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने मनस्वी आनंद झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे, डॉ. तुषार शेवाळे, दादासाहेब जाधव, जिल्हा सरचिटणीस लकी आबा गिल, शहराध्यक्ष देवा पाटील, राज्य परिषद सदस्य भरत पोफळे, ज्येष्ठ नेते हरिप्रसाद गुप्ता, राजेंद्र जहागीरदार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, महेश वाघ, जिल्हा सरचिटणीस धनंजय पवार, तालुकाध्यक्ष योगेश देसले, मंडळ अध्यक्ष रझिया शाह, नलिनी पाटील, अब्दुल अझीझ, जिल्हा चिटणीस विशाल सावळे, अजय वाघ, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा भोसले, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष मंगला तलवारे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस बिंदू शेठ, उपाध्यक्ष संदीप भुसे, मुकेश झुणझुणवाला, युवा मोर्चा शहराध्यक्ष भाग्येश वैद्य, सरचिटणीस हर्षल पवार, सुरेखा भुसे, कल्पना पाटील, रहेमु रहमान, मालती गवांदे, अजय आहिरे, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष निंबा निकम, शब्बीर बाबा, परीक्षित पवार, बापू मिस्तरी, ॲड. चंद्रशेखर शेवाळे, ॲड. गिरीश देशपांडे आणि गजू देवरे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकर्त्यांशी संवाद, संघटनेशी नाळ आणि जनसेवेचा संकल्प!