“जोडे मारो आंदोलनात संजय राऊत यांचा तीव्र निषेध – शिवसैनिकांचा संताप अनावर!”

“जोडे मारो आंदोलनात संजय राऊत यांचा तीव्र निषेध – शिवसैनिकांचा संताप अनावर!”

 मुंबई, २० सप्टेंबर २०२५ –
गुरूवर्य आनंद दिघे साहेब तसेच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वारंवार अपमानास्पद आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय राऊत (उर्फ “९ चा भोंगा”) यांच्यावर संतप्त शिवसैनिकांनी आज तीव्र रोष व्यक्त केला. मालाड पूर्व, शांताराम तलाव परिसरात दुपारी १२.३० वाजता “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले.

या आंदोलनाचं आयोजन शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, शाखाप्रमुख आणि महिला आघाडीने एकत्रितपणे केलं होतं. संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोड्यांनी मारून निषेध नोंदवण्यात आला. “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा अपमान सहन केला जाणार नाही”, असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

शीतल म्हात्रे यांचा रोखठोक सवाल: शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी  बोलताना संजय राऊत यांना खडे बोल सुनावले. “संजय राऊत म्हणतात बाळासाहेबांच्या फोटोच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावू नका, मग तुम्हीच का सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे फोटो बाळासाहेबांच्या शेजारी लावता?”
असा रोखठोक प्रश्न विचारत त्यांनी संजय राऊत यांचं दुतोंडी धोरण उघड केलं.

शिवसेनेकडून इशारा:
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की,
“बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा अवमान करणाऱ्यांना शिवसैनिक कधीच सोडणार नाही. अशा प्रवृत्तींचा प्रत्येक पातळीवर निषेध कायम सुरूच राहील.

या आंदोलनात विभागप्रमुख वैभव भराडकर, अल्ताफ़ पेवेकर, महिला विभागप्रमुख लोचना चव्हाण, शिल्पा वेले, सुमन सावंत तसेच अनेक माज़ी नगरसेवक तसेच उत्तर मध्य मुंबई व पश्चिम उपनगरातील शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.