खारघर येथे पनवेल महानगरपालिका, उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण

खारघर येथे पनवेल महानगरपालिका, उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण
पनवेल,दि.२०: पनवेल महानगरपालिका उद्यान विभाग आणि इन्फिनिटी फाऊंडेशन तसेच विविध महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २०जुलै २०२५ रोजी खारघर येथील सेक्टर २७ ते सेक्टर ३२ अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.

 
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी  आयुक्त श्री. मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा आणि नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.

 
या कार्यक्रमाअंतर्गत आज सेक्टर २७ ते खारघर ३२मध्ये रस्त्याच्या कडेला करंज, कदंब,कांचन,बहावा,आपटा अशा विविध  १५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. महापालिकेच्या उद्यान विभागाबरोबर इन्फिनिटी फाऊंडेशन, पिल्लई अभियांत्रिकी महाविद्यालय एनएसएस युनिट, रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खारघर ,के. एल. ई. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कळंबोली  एनएसएस युनिट, सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर एनएसएस युनिट, डी वाय पाटील एनएसएस युनिटचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
सहा. आयुक्त डॉ. रूपाली माने व उद्यान विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागातील उद्यान पर्यवेक्षक नितीन राठोड, रुपेश चित्रुक, सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक वैभव ठाकरे, इन्फिनिटी फाऊंडेशन अध्यक्ष आयुफ अकुला, यश दुबे, सरचिटणीस, प्रणय उसाटकर सचिव,  समृद्धी पोटे सचिव ,शीतल झांजे महिला विकास सचिव,शिव अनशन सदस्य, मानसी वर्तक सदस्य ,अविप्रा अमृते, सदस्य कॉलेज, एनएसएस  समन्वयक अर्चना इंगोले, शीतल घारगे यांचे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.