पनवेल महानगरपालिका कडून ज्येष्ठ नाट्य कलावंत धनंजय सर्व देशपांडे खारघर अभिनय प्रशिक्षण शिबिर

पनवेल महानगरपालिका कडून ज्येष्ठ नाट्य कलावंत धनंजय सर्व देशपांडे खारघर अभिनय प्रशिक्षण शिबिर
खारघर अभिनय प्रशिक्षण शिबिर
 पनवेल दि.६:- अभिनेता अथवा अभिनेत्री होण्याआधी रंगकर्मींनी सर्वप्रथम रंगभूमी आणि नाट्यशास्त्राचा आशय नीट समजून घ्यावा. आणि मग आपले पाऊल रंगभूमीवर टाकावे असे प्रतिपादन जेष्ठ रंगकर्मी धनंजय सरदेशपांडे यांनी  येथे केले.
 
    पनवेल महानगरपालिका व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त मंगेश चितळे व नाट्य परिषद शाखा पनवेलचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय प्रशिक्षण शिबीर, खारघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात 'अभिनय 'या विषयावर ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

      शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना पुढे ते म्हणाले,
आपण स्वतःचा शोध नाटकाद्वारे घेत असतो. त्याच बरोबर आपली चौफेर नजर तयार करण्याचं काम अशा प्रकारच्या शिबिरातून होत असतं. अभिनय म्हणजे काय, आवजाचा वापर कसा करावा,  नाटक कसं पाहावं, नाटक कसं करावं ह्याच प्रात्यक्षिक त्यांनी शिबिरार्थीना दिले. तसेच भरत मुनींचे नाट्यशास्त्र आणि त्यांचे सिद्धांतही प्रशिक्षणार्थींना त्यांनी समजून सांगितले.
             या वेळी पनवेल महानगरपालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, जनसंपर्क अधिकारी वर्षा कुलकर्णी, नाट्य परिषदेच्या सहकार्यवाहक स्मिता गांधी यांच्या हस्ते श्री. सरदेशपांडे यांना एक सन्मानचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला.
                           .......