संघटनेच्या शाखा उद्घाटन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद – नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
“गनिमी कावा संघाची नवी शाखा – उत्साहात सुरूवात!”
“युवकांसाठी नवे व्यासपीठ – गनिमी कावा युवा संघाची नवीन शाखा सुरू”“समाजसेवा, युवकशक्ती आणि उत्साह – बिबवेवाडीमध्ये नवे आगमन”
बिबवेवाडी:
गनिमी कावा युवा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नव्या शाखेच्या उद्घाटन समारंभाला मान्यवर, पदाधिकारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला
कार्यक्रमाच्या सुरवातीला महिला उपाध्यक्षा आशाताई गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर पुणे शहर महिला कार्याध्यक्षा सौ.उषाताई लोखंडे यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शहराचे माजी महापौर श्री. दत्ताभाऊ धनकवडे उपस्थित होते. त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. बाबुराव घाडगे, सामाजिक कार्यकर्ते श्री. महेश कदम, श्री. गणेश पालखे, श्री दत्ताभाऊ इंडे संघटनेच्या महिला कार्यकारिणी तसेच मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. मान्यवरांनी संघटनेच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याची प्रशंसा करत युवकांना संघटित होऊन समाजकार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात संघटना प्रमुख आयु. संजयभाऊ वाघमारे(संस्थापक)यांनी नविन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यामध्ये दोन प्रदेशाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्या अंतर्गत शहर व वार्ड शाखांचे पदाधिकारीही जाहीर करून नियुक्त करण्यात आले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या ध्येयधोरणानुसार समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
स्थानीय नागरिक व युवकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. शाखेच्या स्थापनेमुळे परिसरातील युवकांना सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीच्या विविध उपक्रमांसाठी एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेकलावंत आयु. सुरेश ओहाळ यांनी केले. शेवटी गनिमी कावा युवा सेवा संघाच्या शाखा फलकाचे रिबिन कापुन कार्यक्रमाची सांगता झाली.