दशावतारातून मानवी उत्क्रांतीचा प्रवास उलगडला
दशावतारातील विविध जीवनमूल्यांचे विश्लेषण करताना मत्स्य अवतारातून संरक्षण, कूर्म अवतारातून आधार, वराह अवतारातून संकटातून मार्ग काढण्याची क्षमता, तर नरसिंह अवतारातून विपरीत परिस्थितीत योग्य मार्ग शोधण्याचा संदेश मिळतो, असे त्यांनी सांगितले. वामन अवतार नम्रतेचे, परशुराम शिस्तीचे, प्रभू राम कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे, तर श्रीकृष्ण बुद्धी, युक्ती आणि विवेकाचे महत्त्व अधोरेखित करतात. बुद्ध अवतारातून शांतता आणि साधनेचा संदेश मिळतो, असे त्यांनी विशद केले.
दशावतारातील कथा केवळ पौराणिक घटना म्हणून न पाहता, त्यातील जीवनमूल्ये आजच्या मानवी जीवनाशी जोडण्याची गरज असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
या व्याख्यानादरम्यान उपस्थितांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमाला संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले. दशावतार, मानवी जीवन आणि उत्क्रांती यांचा नव्या दृष्टिकोनातून घेतलेला हा वेध उपस्थितांसाठी ज्ञानवर्धक आणि विचारप्रवर्तक ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांनी आभार मानले.