बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आरोग्य शिबिर १८६ नागरिकांची आरोग्य तपासणी
इचलकरंजी : भगवान बिरसा मुंडा (धरती आबा) यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव सप्ताहांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आदिवासी फासेपारधी समाजासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) आयोजित या शिबिरात १८६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव साळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमेय काजवे आणि फिजिशियन डॉ. अमृता शिंदे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यासह महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अर्चना तावरे, निवेदिता वाघमारे, रेवती तगारे, निशा कंठाणे, नीलम माने, निलोफर मोमीन आणि शुभांगी रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी आदिवासी फासेपारधी समाजाचे अध्यक्ष मोहन काळे, संपर्कप्रमुख सुभाष चव्हाण, सोमनाथ काळे, प्रकाश काळे, सुनील चव्हाण, अशोक काळे, वसंत काळे, सिकंदर चव्हाण आणि सिकंदर काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
समाजातील गरजू घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान विभागाच्या वतीने शिबिराचे नियोजन करण्यात आले.