लोकशाही दिनी चार तक्रारींचे निवारण

लोकशाही दिनी चार तक्रारींचे निवारण

पनवेल : नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या तत्परतेने सोडविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील बैठक कक्षात सोमवारी ५ ऑक्टोबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले. आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.

लोकशाही दिनात विविध विभागांशी संबंधित चार अर्ज प्राप्त झाले. संबंधित तक्रारींची दखल घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यात आल्या.

यावेळी परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त स्वरूप खारगे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, सामान्य प्रशासन विभाग प्रमुख कीर्ती महाजन, सर्व प्रभाग अधीक्षक तसेच महापालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दर महिन्याला लोकशाही दिन

पनवेल महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. नागरिकांनी आपले वैयक्तिक अर्ज समन्वय अधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी सादर करावेत. तसेच संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनाच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.