ठाणे महापालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ठाणे महापालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
ठाणे महापालिकेतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त जी. जी. गोदेपुरे आणि दीपक झिंजाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर तसेच महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तसेच मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेशकुमार जामनोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.