गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिकेची जय्यत तयारी
ठाणे, दि. 11 : गणेशोत्सवादरम्यान गणेशमूर्तींचे विसर्जन सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी ठाणे महानगरपालिकेने शहरात व्यापक पूर्वतयारी केली आहे. महापालिका हद्दीत एकूण 132 ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अधिकृत विसर्जनस्थळांचा वापर करावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
महापालिकेने विविध प्रभाग समित्यांमध्ये खाडी घाट, विसर्जन टाक्या, कृत्रिम तलाव, मूर्ती स्वीकृती केंद्रे आणि फिरती विसर्जन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांना जवळच्या परिसरातच विसर्जनाची सुविधा मिळावी, यावर प्रशासनाने भर दिला आहे.
उथळसर प्रभाग समिती
उथळसर प्रभाग समितीअंतर्गत रुस्तमजी 1 व 2, परुळेकर मैदान, सिद्धेश्वर टाकी, ऋतूपार्क, परमार्थ निकेतन, मुख्यालयाजवळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे विसर्जन टाक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जेल तलाव येथे मूर्ती स्वीकृती केंद्र असून आंबेघोसाळे आणि रुणवाल नगर येथे कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. फिरत्या विसर्जनासाठी एक ट्रक उपलब्ध आहे.
नौपाडा कोपरी प्रभाग समिती
कोपरी मीठबंदर विसर्जन घाटासह रहेजा संकुल, कशिश पार्क, सद्गुरू गार्डन, बारा बंगला, राऊत स्कूल, भक्ती मंदिर आणि गणेश टॉकीज परिसरात विसर्जन टाक्यांची सुविधा आहे. मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा आणि टेंभी नाका येथे मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत. मासुंदा दत्त घाट, कोपरी आणि अष्टविनायक चौक परिसरात कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. एक फिरता विसर्जन ट्रक उपलब्ध आहे.
कळवा प्रभाग समिती
पारसिक रेतीबंदर आणि कळवा विसर्जन घाट येथे खाडी विसर्जनाची सुविधा असून 90 फूट रोड, सह्याद्री शाळा, सायबा क्रीडानगर, मनीषा नगर, खारेगाव नाका, विटावा आणि कळवा गावदेवी मैदान परिसरात विसर्जन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. खारीगाव, घोलाई नगर, न्यू शिवाजी नगर, कळवा तलाव आणि विटावा परिसरात कृत्रिम तलावांची व्यवस्था आहे. फिरत्या विसर्जनासाठी एक ट्रक उपलब्ध आहे.
दिवा प्रभाग समिती
खर्डीगाव खाडी घाट येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पडले बीएसयूपी, माय सिटी, दिवा प्रभाग समिती, रिव्हरवुड कॉम्प्लेक्स, अरिहंत आरोही, कल्याण शीळ रोड, दिवा महोत्सव मैदान, मुक्ता हाइट्स आणि इतर परिसरात विसर्जन टाक्या उपलब्ध आहेत. दातिवली तलाव, खिडकाळी तलाव आणि पडले गावातील सरस्वती शाळेजवळ कृत्रिम तलावांची व्यवस्था आहे. एक फिरता विसर्जन ट्रक उपलब्ध आहे.
मुंब्रा प्रभाग समिती
रेतीबंदर विसर्जन घाट 1 आणि 2, राणानगर तसेच बाबाजी पाटीलवाडी येथे खाडी विसर्जनाची सुविधा आहे. रेतीबंदर, बाबाजी पाटीलवाडी, आनंदनगर कोळीवाडा, राणानगर आणि शंकर मंदिर तलाव परिसरात विसर्जन टाक्या उपलब्ध आहेत. शंकर मंदिर तलावाजवळ कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरत्या विसर्जनासाठी एक ट्रक उपलब्ध आहे.
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती
कोलशेत, बाळकुम आणि गायमुख विसर्जन घाट येथे खाडी विसर्जनाची सुविधा आहे. स्प्रिंग हिल सोसायटी, वाघबीळ, विजयनगरी ॲनेक्स, लोढा लक्झेरिया, माजिवडा, अर्बन पार्क, हायलॅण्ड मैदान, दोस्ती काऊंटी, लोढा स्प्लेंडोरा आणि लोढा अमारा परिसरात विसर्जन टाक्या उभारण्यात आल्या आहेत. रिजन्सी हाइट्स आझादनगर आणि लोढा लक्झेरिया येथे मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत.
रेवाळे तलाव, बोरीवडे गाव, मिलेनियम स्टार किड्स शाळेजवळ, अनामित्रा सोसायटी, हिरानंदानी न्यू होरायझनजवळील टीएमसी मैदान तसेच कोलशेत, गायमुख आणि बाळकुम येथील विसर्जन घाटांवर कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. फिरत्या विसर्जनासाठी दोन ट्रक उपलब्ध आहेत.
लोकमान्य सावरकर प्रभाग समिती
लोकमान्य नगर बस स्टॉप, लक्ष्मी पार्क, सिद्धिविनायक उद्यान, आचार्य अत्रे मार्ग, कोरस नक्षत्र संकुल, दोस्ती विहार, पु. ल. देशपांडे मार्ग आणि रुणवाल प्लाझा परिसरात विसर्जन टाक्यांची सुविधा आहे. कामगार हॉस्पिटल येथे मूर्ती स्वीकृती केंद्र असून फिरत्या विसर्जनासाठी दोन ट्रक उपलब्ध आहेत.
वागळे प्रभाग समिती
रस्ता क्रमांक 22, नेप्च्यून एलिमेंट कंपनीजवळ, पासपोर्ट ऑफिसजवळ, श्रीनगर, अय्यप्पा मंदिर, हिंदुस्थान हॉटेल, अंबिका नगर, आयटीआय सर्कल, रोड क्रमांक 27 आणि रतनबाई कंपाऊंड परिसरात विसर्जन टाक्यांची व्यवस्था आहे. किसन नगर बस स्टॉप आणि मॉडेला चेक नाका येथे मूर्ती स्वीकृती केंद्रे आहेत. रायलादेवी येथे दोन कृत्रिम तलाव असून दोन फिरते विसर्जन ट्रक उपलब्ध आहेत.
वर्तकनगर प्रभाग समिती
वसंत विहार क्लब हाऊस, समता नगर वेलफेअर सेंटर, पवारनगर बस स्टॉप, स्वामी विवेकानंदनगर, सिद्धांचल संकुल, इलाईट गार्डन, समतानगर तारांगण, हाइड पार्क, उन्नती गार्डन आणि देवदर्शन डोंगरीपाडा येथे विसर्जन टाक्यांची व्यवस्था आहे. देवदयानगर आणि शिवाई नगर येथे मूर्ती स्वीकृती केंद्रे असून उपवन तलाव, वर्तकनगर नाका, देवदयानगर, पालायदेवी मंदिर, युनी ॲबेक्स आणि मुल्ला बाग परिसरात कृत्रिम तलावांची सुविधा आहे. फिरत्या विसर्जनासाठी दोन ट्रक उपलब्ध आहेत.
गणेशमूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांनी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत स्थळांचा वापर करावा. जलप्रदूषण टाळण्यासाठी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून महापालिकेच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.