१४ सप्टेंबरच्या सारथी प्रणालीवरील अनुज्ञप्ती कामकाजासाठी पर्यायी व्यवस्था

१४ सप्टेंबरच्या सारथी प्रणालीवरील अनुज्ञप्ती कामकाजासाठी पर्यायी व्यवस्था
१४ सप्टेंबरच्या सारथी प्रणालीवरील अनुज्ञप्ती कामकाजासाठी पर्यायी व्यवस्था

पुणे, दि. ८ : १४ सप्टेंबर २०२६ रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड आणि संगम ब्रिज कार्यालयातील सारथी प्रणालीवरील अनुज्ञप्तीविषयक कामकाजाच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आला आहे.

१४ सप्टेंबर रोजी नियुक्ती असलेल्या अर्जदारांनी त्यांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

१५ सप्टेंबर रोजी उपस्थित राहणे शक्य नसलेल्या अर्जदारांना १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत कोणत्याही दिवशी उपस्थित राहून अर्ज साद करता येणार आहे. अशा अर्जदारांसाठी १४ सप्टेंबरची मूळ नियुक्ती तारीख ग्राह्य धरली जाणार आहे.

संबंधित अर्जदारांनी या बदलाची नोंद घेऊन दिलेल्या कालावधीत आपले अनुज्ञप्तीविषयक कामकाज पूर्ण करावे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्याकडून कळविण्यात आले आहे.