शैक्षणिक व्यवस्थेचा आढावा घेत गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव
ठाणे, दि. १५ ऑक्टोबर : राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी चला शाळेत जाऊ या अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्याला भेट देऊन जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, आयडॉल शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे आणि शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यात आले.
या बैठकीला आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, देविदास महाजन, महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, अभिनव गोयल, अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
चला शाळेत जाऊ या अभियानाच्या माध्यमातून शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध बाबींचा आढावा घेणे यावर भर दिला जात आहे.