मुंबई दि. २० ऑगस्ट - मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली.
मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी या सर्व सेलच्या प्रमुखांची बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या.
या बैठकीला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक - शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष भास्कर विचारे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव आदींसह महिला सेलच्या मुंबई अध्यक्षा आरती साळवी, मुंबई कार्याध्यक्षा मनिषा तुपे, मुंबई विद्यार्थी अध्यक्ष विभू घुगे, ओबीसी अध्यक्ष बबन मदने, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष बापू धुमाळे, सहकार सेल अध्यक्ष नंदकुमार काटकर, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष हुजफ्फा इलेक्ट्रिकवाला, झोपडपट्टी सुधार सेलचे घनश्याम भापकर आदी उपस्थित होते.
[7:03 PM, 8/20/2025] Rupali Ks: _//__