स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड

स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी निवड

पंढरपूर-  २६ जानेवारी रोजी ‘प्रजासत्ताक दिना’ निमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडसाठी गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ऋषिकेश नामदेव सातपुते यांची निवड करण्यात आली असून त्यांना पालकांसह दिल्लीत आमंत्रित केले गेले आहे. ऋषिकेश सातपुते यांच्या या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
           स्वेरीचे विद्यार्थी हे सर्व स्तरात विशेष प्राविण्य गाजवत असतानाच  (दि.२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ऋषिकेश नामदेव सातपुते यांची परेड साठी निवड केली असून त्यांना पालकांसह दिल्ली मध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. स्वेरीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम अधिक परिणामकारकपणे  राबविले जातात. त्यातून ऋषिकेश सातपुते यांचे 'माय भारत पोर्टल' संदर्भातील कार्य अधिक लक्षवेधी ठरल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली आहे. अलीकडेच त्यांचा पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठात माननीय कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वेरीला या संदर्भात रीतसर पत्र देवून  कळविण्यात आले आहे. स्वेरीच्या ऋषिकेश सातपुते यांच्या निवडीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. आर.के. वडजे, रा. से. यो. चे  विभागीय समन्वयक डॉ. संजय मुजमुले, स्वेरीचे संस्थापक सचिव कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम. पवार, संस्था अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयांचे प्राचार्य, इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस.मठपती, स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख,प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व पालकांनी ऋषिकेश नामदेव सातपुते यांचे अभिनंदन केले आहे.