स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे अनवली येथे उदघाटन

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसीच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे अनवली येथे उदघाटन

पंढरपूर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने अनवली (ता. पंढरपूर) मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.
         प्रारंभी राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच वल्लभ घोडके यांच्या हस्ते करून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे उदघाटन करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘विशेष श्रमसंस्कार शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दि.२३ जानेवारी पासून ते दि. २९ जानेवारी २०२५ पर्यंत आठवडाभर चालणाऱ्या या ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या शिबिराची संपूर्ण रूपरेषा व यासंबंधी सविस्तर माहिती दिली. पोलीस पाटील तौफिक शेख हे स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीच्या स्वयंसेवकांचे कौतुक करताना म्हणाले की, ‘स्वेरीचे शैक्षणिक उपक्रम नेहमीच चांगले असतात. मागच्या वर्षी प्रमाणे या ही वर्षी स्वयंसेवकांना अनवली ग्रामस्थ मंडळींकडून यथोचित सहकार्य मिळण्याची ग्वाही मी देतो.’ असे सांगून स्वेरीच्या उपक्रमांचे स्वागत केले. उपसरपंच संदीप डिसले यांनी शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंढरपूर विभागीय समन्वयक डॉ. संजय मूजमुले यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगून स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात ग्रामस्वच्छ्ता अभियान, श्रमदान, 'महिलांचे आरोग्य व आहार’ या विषयावर पंढरपूर पंचक्रोशीत अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या डॉ. बी.पी.रोंगे हॉस्पिटल तर्फे स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे यांचे व्याख्यान, वृक्ष लागवड, वत्सल नेत्रालय पंढरपूर येथील डॉ. राखी मणियार यांच्या उपस्थितीत डोळे तपासणी शिबिर, पंढरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांचे नवीन कायदे व डिजिटल फ्रौड या बाबत मार्गदर्शन, 'डिजिटल साक्षरतेसाठी युवक' या सारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यावेळी माजी सरपंच गजेंद्र शिंदे, महाराष्ट्र शासनाचा 'आदर्श पोलीस पाटील' पुरस्कार विजेते तौफिक शेख, तलाठी नवनाथ मोरे, सचिन शिंदे, विद्यार्थी प्रतिनिधी मयूर फंड, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्राची शिंदे, रा.से.यो.चे सर्व स्वयंसेवक आणि अनवली येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.हेमंत बनसोडे यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.