स्वेरीत ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा

स्वेरीत ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा
स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना केले विद्यार्थ्यांनी अभिवादन
 
पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग (ऑटोनॉमस) च्या एम.बी.ए विभागाच्या वतीने ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ अंतर्गत ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला तसेच स्वामी विवेकानंद यांची १६१ वी जयंती व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची ४२६ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्त प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी बहुमोल विचार मांडले.
     १९८४ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारत सरकारने १२ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून घोषित केला होता. तेंव्हापासून देशभरात दरवर्षी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिवस’ म्हणून साजरा होऊ लागला. हा दिवस संपूर्ण भारतात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मिरवणूक, भाषण, संगीत, युवा संमेलन, चर्चासत्रे, सादरीकरण, निबंध-लेखन, पठण इत्यादी स्पर्धांसह साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांचे विचार व आदर्श प्रत्येक युवापिढींपर्यंत पोहोचवणे हा यामागील हेतू आहे. स्वेरीमध्ये ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’ तर्फे प्रत्येक वर्षी ‘राष्ट्रीय युवा दिवस’ हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दीप प्रज्वलनानंतर स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रथम वर्षाचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर हे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त म्हणाले की, ‘युवाशक्तीची देशाला असणारी गरज आणि त्या माध्यमातून राष्ट्र विकासासाठी युवकांचे अतुलनीय योगदान आहे. युवकांनी मोबाईलच्या मोहजालातून बाहेर येत स्वतःमधील आव्हानांचा सकारात्मक पद्धतीने सामना करत संघर्ष करणे सध्या गरजेचे आहे. आजचा युवक हा व्यसनाधीन होत असून त्यातून त्यांनी लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे.’ तसेच राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना डॉ. खेडकर म्हणाले की, ‘विद्यार्थीदशेपासून एक चांगली स्त्री म्हणून जीवनात व समाजात आपण वागले पाहिजे, आपल्या वागण्यातून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले पाहिजे'  हे सांगताना त्यांनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या इतिहासातील शौर्याचे अनेक दाखले दिले तसेच या कार्यक्रमात ‘इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल’चे प्रेसिडेंट प्रा. दिग्विजय डी. रोंगे, एमबीए विभागप्रमुख डॉ. के. पी. गलानी, ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’च्या समन्वयिका डॉ. एम. एम. भोरे, डॉ. एन. एस. मगर, प्रा. एस. डी. सरीक, प्रा. ए. ए. अहमद यांच्यासह इतर प्राध्यापक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.के. पी. कोंडूभैरी यांनी केले तर आभार प्रा. पी.एस.मोरे यांनी मानले.