अफाट - अचाट, माणसातील देव माणूस, अपरिमित काळजाचं मन अन् प्रत्येकाला आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व मा. हेमेंद्र पाटील

अफाट - अचाट, माणसातील देव माणूस, अपरिमित काळजाचं मन अन् प्रत्येकाला आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व मा. हेमेंद्र पाटील
महाराष्ट्राच्या भूमीवर साहित्यिक, उत्तम वक्ते, विनोदी लेखक, विनोदी वक्ते, समाज प्रबोधक अनेक होऊन गेले. त्यातील प्रकर्षाने घेतलं जाणार नाव म्हणजे प्र. के. अत्रे 
जरी महाराष्ट्राच्या भूमीवर असे अनेक जण होऊन गेले असतील त्यांची इतिहासातही नोंद झाली. 
परंतु वर्तमान काळात सुद्धा असे अनेक विनोदी वक्ते समाज प्रबोधक, देव माणसं ते आपल्या दैनंदिन जीवनात उमटून पडतात.
 
सुरुवातीलाच काही गोष्टी मी स्पष्ट करतो
सहाजिकच मी जिथे काम करतो, वास्तव्य करतो तिथे मला वेगळं आणि विशिष्ट शोधायला आणि समाजासमोर मांडायला नेहमीच आवडतं. आणि समाजासमोर मांडण्यात त्यात माझा किंतुही स्वार्थ नसतो. 
आज जरी ते माझे (बॉस)वरिष्ठ अधिकारी असले. 
तरी त्यांच्याविषयी लिहिताना माझ्या मनाला स्वार्थ विचाराची चुणूकही मनाला लागली नाही. विशेष, उत्तुंग, मनाला भावणारं, अपरीमित काळजाचं व्यक्तिमत्त्व वाटलं म्हणून माझ्या मनाला अन् हाताला मी लिखाणापासून आवरू शकलो नाही....
 
आज ज्या  व्यक्तिमत्वाबद्दल आपण वाचता आहात ते एक अफाट आणि अचाट व्यक्तिमत्व म्हणून नेहमीच जीवनाच्या सुरुवातीच्या ते आताच्या टप्प्यापर्यंत संघर्षाची काटेरी वाट तुडवत अन् संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला नकळतपणे ज्यांच्याकडून शिकवण मिळत राहते. ते आदरणीय श्री हेमेंद्र पाटील सर.
संकटमोचक हनुमंतरायाचे निकटिय भक्त असल्याने आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपल्याला कुणाचे तरी संकटमोचक होता येईल का? नेहमीच आपला आधार इतरांना सहज मिळावा हीच त्यांची वृत्ती असते.
सतत मोठी आव्हाने कायम पेलत आपल्या जीवनाचा प्रवास हा केवळ स्वार्थाचा नसून मानव धर्माची उद्दिष्टे दाखवून देणारा खरा त्यांचा प्रवास आहे.
 
देवाला, समाजाला, मानवतेच्या धर्माला, मानणारे लोक हल्ली शोधूनही सापडत नाहीत. असले तरी ते बोटावर मोजण्याइतकेच. त्यातील हे प्रकर्षाने घेतलं जाणवणारं नाव म्हणजे हेमेंद्र पाटील सर.
त्यांच्या सहवासातील आठ महिन्यात मला विशेष आणि मनाला भावणारी वाक्य आणि वागणूक. आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय.
 
प्रत्येक बैठकी शेवटी अर्थात मीटिंग च्या शेवटी त्यांच्याकडून अधोरेखित पणे बोललं जाणार वाक्य म्हणजे "माझ्याकडून मी काही वाईट बोललो असेल तर मला माफ करा." 
एवढा हा नितळ माणूस. 
"जे काही बोललो असेल ते तुमच्या भल्यासाठी बोललोय रे बाबांनो. कामाला लागा आणि सर्वांसमोर आणि सर्वांच्या नजरेत हिरो म्हणून समोर या." 
हीच ती संवादाच्या शेवटी बोलली जाणारे वाक्य.
 
प्रत्येक संभाषणानंतर, संवादानंतर काहीतरी समोरच्याला शिकायला मिळतं समोरच्याला विचार करायला लावत असा त्यांचा संवाद असतो.
खरंतर चिकित्सक बुद्धी असणाऱ्या माणसाला त्यांचे संवादातील मुद्दे अगदीच लिहूनही ठेवावसे वाटतात 
खरतर ते तितकेच विनोदी आणि मार्मिक असतात. 
मला वाटलेले आणि माझं लक्षात राहिलेले त्यातीलच काही मुद्दे म्हणजे. 
१) सचिन तेंडुलकर ला कॅप्टन केलं तर त्याचा गेम पिसळायला पाहिजे का? 
(म्हणजेच तुमच्यात कला आहे परंतु तुमच्यावर एखादी जबाबदारी टाकल्यानंतर ती कला लोप पावायला नको उलट त्याचा टीमला फायदा व्हावा असाच त्याचा काहीसा अर्थ..)
२) म् चा भ् करू नका (म्हणजेच कोणतेही काम करताना त्यामध्ये पारदर्शकता ठेवून दोन्ही गोष्टी भिन्न आहेत या गोष्टी दाखवा.)
३) असं काम करा म्हणजे तुमच्या पगारी वाढतील तुम्हाला शिल्लक चे पैसे भेटतील तुमच्या लेकरा-बाळाचं भलं होईल. (असं असे एका दमात बोलून नोकरीचा उद्देश अन् आपल्या कामाचा उद्देश झटकन समोरच्याच्या डोळ्यासमोर आणून ठेवतात.)
 
अगदी कॉलेजच्या व  सुरुवातीच्या जीवनापासून प्रचंड संघर्ष त्यांनी केला.
अगदी त्यांच्याच वर्ग मित्रांकडून त्यांच्या विषयीची माहिती घेतल्यानंतर आपल्याच काळजाला घाम फुटावा एवढा त्यांचा मोठा संघर्ष.
बीएससी बीएससी कृषी या पदवीला असताना त्यांनी अगदी घरगुती गॅस रिवायडींग, व इलेक्ट्रॉनिक्स बॅटरी विकण्यापासून मोठा संघर्ष त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला आहे. परंतु विसरू काही करत असताना कधीच निराशेचे विचार त्यांनी केले नाही आणि ते विचारांना थारा सुद्धा त्यांनी दिला नाही. त्यांच्या वर्ग मित्रांकडून त्यांचे विषयीचा संघर्ष जाणून घेत असताना आपण एखादा सिनेमा बघतो की अशी चित्र समोर उभे राहतात आणि खूप मोठ्या आणि वेगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या कडून स्वतःला मिळतात. जीवनाच्या सुरुवातीच्याच कालखंडा पासून ते आतापर्यंत मोठी संघर्षाची वाट पायदळी तुडवत आपल्यासमोर उभे ठाकलेले हेमेंद्र पाटील सर अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.
 
(लेखन - गोपाल उगले)
मो - 9503537577