अपघातग्रस्त कुटुंबाला दिली रोख मदत
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.8, आजूबाई देवीच्या स्वारीसाठी जात असताना लिहाखेडी फाट्याजवळ दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात उपळी ता. सिल्लोड येथील काशिनाथ पांढरे, विकास सोने ,समाधान आघाडे हे तिघे मित्र ठार झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. अब्दुल सत्तार यांनी उपळी येथे सोमवार रोजी सांत्वन भेट दिली.
याप्रसंगी आ. अब्दुल सत्तार यांनी अपघातात मृत्यू झालेल्या तिन्ही परिवाराची भेट घेवून घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. तसेच मित्र मंडळाच्या वतीने शोकाकुल तिन्ही परिवारास आ. अब्दुल सत्तार यांनी प्रत्येकी 75 हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द केली.
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शोकाकुल परिवाराने धीर धरावा शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे सांगत अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही आ. अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, दत्ता शेजुळ,ग्राम पंचायत सदस्य प्रदीप शेजुळ, विठ्ठल गायकवाड, राजेंद्र शेजुळ, बंडू फलाने, राजेंद्र सुरडकर, पवन फलाने, प्रवीण शेजुळ, उपसरपंच विनोद शेजुळ, सुभाष शेजुळ, रमेश शेजुळ, बबन शेजुळ, सुभाष शेजुळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.