लोककल्याण कार्यालय उत्तर मुंबईच्या विकासाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार - केंद्रीय मंत्री पियुष गोयल

लोककल्याण कार्यालय उत्तर मुंबईच्या विकासाचा प्रमुख केंद्रबिंदू ठरणार - केंद्रीय मंत्री पियुष गोयल

दि. ३१(विशेष प्रतिनिधी रूपाली बैसाणे मुंबई ): ज्येष्ठ भाजप नेते वेदप्रकाश गोयेल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी लोक कल्याण कार्यालयाचे उद्घाटन  करण्यात आले याप्रसंगी मंत्री महोदय यांनी  म्हणाले," हे कार्यालय जनतेसाठी समर्पित असून, लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी,असून  विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आणि उत्तर मुंबईच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका ."
 बजावेल." हे कार्यालय 


 मुंबईतील कांदिवली पश्चिमेतील बलसिनोर इमारती  येथे असून कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आशिष शेलार, कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार योगेश सागर आमदार मनीषा चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात  केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात 11 वर्ष काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, त्यांचे भारतीय जनता पक्षाशी बालपणापासून असलेले दृढ नाते त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या वडिलांचे, वेद प्रकाश गोयल यांचे, प्रेरणादायी कार्य हीच त्यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल सुरू होण्यामागील मुख्य प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. 
ते पुढे म्हणाले,"पक्षाने मला नेहमी समाज आणि राष्ट्रसेवेची संधी दिली. माझ्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची जबाबदारी सोपवली. उत्तर मुंबईतील जनतेने मोदीजींवर विश्वास ठेवत मला प्रचंड मताधिक्याने निवडून दिले, याचा मला अभिमान आहे."
पंतप्रधान मोदींच्या 'जनतेशी सातत्याने संपर्क आणि कल्याणकारी कार्य'या दृष्टिकोनावर भर देत, गोयल म्हणाले,"मोदीजी आम्हाला नेहमीच जनतेमध्ये राहण्याचे, त्यांच्याशी जोडले ले राहण्याचे आणि लोकसभेसाठी समर्पित राहण्याचे मार्गदर्शन करतात. या महत्त्वाच्या प्रसंगी लोककल्याण कार्यालयाची स्थापना झाल्याचा आनंद आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा, तसेच वरिष्ठ नेते राम नाईक यांच्या सन्माननीय उपस्थितीत हे कार्यालय सुरू करताना अभिमान वाटतो."तसेच जनतेसाठी समर्पित हे कार्यालय लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबवण्यासाठी आणि या परिसराच्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्य करेल असेही ते म्हणाले पियुष गोयल यांनी लोककल्याण कार्यालयाचे उद्घाटन संपर्क अधिक बळकट केला 
लोक कल्याण कार्यालय सार्वजनिक तक्रार सोडवण्याचे कल्याणकारी उपक्रम सुलभ करण्याचे आणि उत्तर मुंबईच्या विकासाला गती देण्याचे केंद्र ठरणार वेदप्रकाश गोयल यांच्या जन्मशताब्दी वर्षानंतर उद्घाटन केले.