मारुती गलांडे यांना समाजभूषण पुरस्कार

मारुती गलांडे यांना समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने  बी.बी.एस. स्कूल,काॅलेज  वाघोली येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांना कार्यानुरूप पुरस्कार देण्यात आले.
    गलांडे यांचे कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पध्दतीचे असुन त्यांच्यात असलेल्या नेतृत्व गुणांची चुणुक शालेय विद्यार्थी जीवना पासुन सुरु झाली.
     पुढे राजकीय क्षेत्रात काॅंग्रेस पक्षाचे हवेली तालुका युवक उपाध्यक्ष, त्याकाळात अंदोलन राजकीय कैदी, पुढे कामगार क्षेत्रात भरीव कामगिरी, वडगांव शेरी गावच्या ग्राम पंचायत सदस्य,शिक्षण कमेटी चेअरमन,, यशवंत ना.सह. सोसायटी सदस्य,नगर रोड कामगार कृती समितीचे कामगार नेते, WNC कंपनीत कामगार संघटना अध्यक्ष व कामगार सोसायटीचे चेअरमन म्हणून निस्वार्थ कामगार सेवा केली म्हणूनच की काय महाराष्ट्र सरकारने दखल घेऊन गुणवंत कामगार या पुरस्काराने राज्यपालांनी सन्मानित केले.
    आता सध्या विद्यमान - चेअरमन:- जव्हेरनगर हौ.सोसा., अध्यक्ष:- ज्येष्ठ नागरिक संघ वडगांव शेरी , उपाध्यक्ष :- येरवडा विभाग ज्येष्ठ नागरिक महासंघ ,  अशा विविध क्षेत्रात भरीव कार्य केले.
   खेळ, नाट्य, दुरदर्शन मालिका तसे शेती क्षेत्रात पुरस्कार मिळाले.
  आता रिटायर कामगारांच्या साठी गल्ली ते दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अशोक राऊत सर् यांच्या नेतृत्वाखाली Eps-95 संघर्ष समिती पुणे शहर कार्यकारिणी उपाध्यक्ष म्हणून लढा देऊन कामगार पेन्शन वाढी साठी प्रयत्नशिल.
     वेळात वेळ काढून सांप्रदायिक क्षेत्रात पदार्पण करून भजन, प्रवचन सेवा, १३ वर्षं अखंड आळंदी ते पंढरपूर पायी वारी,  
    वरील सर्व कार्याची दखल घेऊन समाजातील जागरुक महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ अध्यक्ष बाळासाहेब सातव सर् यानी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष श्री. प्रदीप दादा गारटकर यांच्या शुभहस्ते, कृषी उत्पन्न बा.समीती पुणे सभापती सुभाष जगताप, सदस्य नाना अबनावे, कटके साहेब,सातव पाटील, wnc का.संघटना माजी अध्यक्ष बाळासाहेब हेंद्र/ खेडकर , ज्येष्ठ ना.संघ वडगांव शेरी सेक्रेटरी सुभाष पवार, सदस्य सुर्यवंशी, चव्हाण,काळे बी.बी.एस. शाळा कॉलेज चे विद्यार्थी, शिक्षक,पालक व वाघोली परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत  ह.भ.प.मारुती नाना गलांडे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.