कष्टकरी संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांचा होणार गौरव
लोणार (प्रतिनिधी) – कष्टकरी संघ मागील काही वर्षांपासून विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजातील सलोखा वृद्धिंगत करणारे उपक्रम राबवत आहे. सर्वसामान्यांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे काम संघ सातत्याने करत असून “सर्व जन हिताय, सर्व जन सुखाय” या उक्तीला साजेशी भूमिका संघाने जपली आहे. स्पष्ट भूमिका आणि “जय महाराष्ट्र” हा बाणा स्वीकारत कष्टकरी संघाची चळवळ दिवसेंदिवस अधिक गतीमान होत आहे.
याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कष्टकरी संघाच्या वतीने यावर्षी प्रथमच महाराष्ट्र राज्यस्तरीय सन्मान (पुरस्कार) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय व दखलपात्र कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तिमत्त्वांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच मानाचा फेटा देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असून कार्यक्रम भव्य आणि दिमाखदार स्वरूपात पार पडणार आहे. या पुरस्कारांसाठी विविध प्रेरणादायी नावांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये प्रेरणास्तंभ, कर्तृत्ववान, मानबिंदू, अभिमान, रत्न, भूषण, दीपस्तंभ, दिशा-दर्शक आणि तेजस्वी व्यक्तिमत्व अशा सन्मानांचा समावेश आहे. तसेच राज्यस्तरीय आकर्षक नावांमध्ये “महाराष्ट्र कर्तृत्वरत्न पुरस्कार २०२६”, “महाराष्ट्र प्रेरणास्तंभ पुरस्कार २०२६”, “महाराष्ट्र अभिमान गौरव पुरस्कार २०२६”, “महाराष्ट्र मानबिंदू पुरस्कार २०२६” आदी नावांचा समावेश करण्यात आला आहे. कष्टकरी संघासाठी खास सुचविण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये “कष्टकरी कर्तृत्वरत्न पुरस्कार २०२६”, “कष्टकरी प्रेरणास्तंभ पुरस्कार २०२६”, “कष्टकरी समाजभूषण पुरस्कार २०२६”, “कष्टकरी अभिमान गौरव पुरस्कार २०२६” ही नावे विशेष आकर्षण ठरत आहेत. यापैकी “कष्टकरी कर्तृत्वरत्न पुरस्कार २०२६” हे नाव सर्वाधिक प्रभावी व दमदार मानले जात आहे.तरी सामाजीक , शैक्षणिक , सांस्कृतीक , कृषी , सहकार , उद्योग , वैद्कीय , प्रशासकीय , पत्रकारीता ( वृत्तपत्र , डिजीटल मिडिया) युवक , युवती , महिला , गायक , साहित्य क्रीडा , पर्यावरण , सामाजिक सलोखा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपले प्रस्ताव कष्टकरी संघाच्या पुरस्कार निवड समितीकडे दि. २५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत किंवा अधिक माहिती साठी 9011270128 /9011270157/ 9881835317 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कष्टकरी संघाच्या वतीने करण्यात आले आहे.हा उपक्रम समाजातील प्रेरणादायी कार्याला व्यासपीठ देणारा ठरेल, तसेच नव्या पिढीसाठी आदर्श निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.