पुणे, प्रतिनिधी - देशातील सर्वात मोठी समस्या ही पाणी संवर्धन आहे. जगात पाण्याची भीषण परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर पाणी प्रश्न समजून घेतला गेला पाहिजे. भविष्यातील पिढीसाठी पाणी संवर्धन करणे आवश्यक आहे. पाणी आणि शेती याशिवाय लोक जगू शकणार नाही असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'जलमित्र” पुरस्कार' या वर्षी आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त सनदी वनाधिकारी (IFS) डॉ. अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात आला.
याबरोबरच डॉ. मोहन धारियांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ. धारियांना लक्षवेधी सन्मान