पुसद तालूका प्रतिनिधी
काटखेडा (देवी तांडा) येथे भिम टायगर सेना
ग्रामीण शाखा प्रणित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती व प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.
बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती गाव वाड्या वस्त्या नव्हे तर संपूर्ण देशासह जगामध्ये साजरी केली जाते. भीम टायगर सेनेचे जिल्हा सचिव अण्णा दोडके यांनी परिवर्तन विचाराची प्रेरणा घेऊन फुले शाहू आंबेडकरांचे विचार गाव खेड्यात रुजविण्याची ते काम करीत आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकरी विचाराची ख्यातनाम गायिका वैशाली ताई बनसोडे यांच्या संध्या निळ्या पाखरांची हा प्रबोधनाचा प्रमुख कार्यक्रम संपन्न झाला.
सर्वप्रथम काटखेडा येथील पंचशील ध्वज जय भीम स्तंभ येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
तसेच सभामंचावरील महापुरुषाच्या प्रतिमांना
प्रमुख पाहुणे व आथीती यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी देवेंद्र खडसे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि ग्रामीण भागात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत आहें भीम विचाराने प्रेरित झालेले संघटनेचे सचिव अण्णा दोडके यांचे अभिनंदन केले व सर्व उपस्थित जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच माजी जिल्हा प. सदस्य भोलेनाथ कांबळे, शासकीय ठेकेदार नारायण ठोके, पत्रकार राजेश ढोले इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त करताना आंबेडकर जयंतीच्या ग्रामीण भागातील सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष भाषण करताना किशोर दादा कांबळे म्हणाले की शहरी भागापेक्षा ही ग्रामीण भागात बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग अतिशय ऊर्जावान आहे या ठिकाणी महिला आबाल वृद्ध मुले यांची उपस्थिती बघून भीम टायगर सेनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या भीम टायगर सेना सदैव आपल्या पाठीशी उभी आहे.
आपण रस्त्यावरील संघर्षमय कार्यकर्ता असून कोणत्याही संकटाला घाबरून न जाता सदैव आपल्या सोबत असल्याचे उपस्थित बांधवांना आश्वासित केले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिति कार्यक्रमाचे अध्यक्ष भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे माजी पं. समिती सदस्य देवेंद्र, खडसे,माजी जि. प. स. भोलेनाथ कांबळे, शासकीय ठेकेदार नारायण ठोके,पत्रकार राजेश ढोले, हेमंत इंगोले,विजय बहादुरे,
भारत कांबळे, संदीप कांवळे, विष्णू सरकटे, प्रभाकर खंदारे,जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड,राजकुमार पठाडे,रवी सिंगनकर
शिलाबाई दोडके,माया दोडके,बेबी जाधव, वेणूबाई दोडके, रमाबाई दोडके,रविकांत सुरोशे
आंबेडकरी
प्रबोधनकार वैशालीताई बनसोडे व त्यांचा प्रबोधन संच, आयोजक अण्णा दोडके इत्यादी सह महिला बालक युवक तथा असंख्य बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे जनार्दन सूत्रसंचालन गजभिये सर यांनी केले.