प्रभाग समिती अ खारघर अंतर्गत, सेक्टर २७, खारघर येथे पनवेल महानगरपालिका, उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण

प्रभाग समिती अ खारघर अंतर्गत, सेक्टर २७, खारघर येथे पनवेल महानगरपालिका, उद्यान विभागामार्फत वृक्षारोपण
पनवेल,दि.21 : महानगरपालिका उद्यान विभाग आणि कॉज ट्रॅव्हलर्स सोशल वेल्फेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच खारघर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
 
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आयुक्त श्री. मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे आणि उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा आणि नागरिकांना मोफत वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पनवेल महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सुरू आहे.
 
या कार्यक्रमाअंतर्गत  सेक्टर २७, खारघर येथे अमलतास आणि कांचन अशा २६ वृक्षांचे रोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमाला कॉज ट्रॅव्हलर्स सोशल वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष भाल शेखर चिलाना, बँक ऑफ इंडिया सेक्टर ३५ खारघर शाखा व्यवस्थापिका रोहिणी राठोड तसेच खारघर येथील वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये नेहमी पुढाकार  घेत असलेल्या समाजसेविका छाया तारळेकर उपस्थित होत्या.
 
सहा. आयुक्त डॉ. रूपाली माने व उद्यान विभागप्रमुख अनिल कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागातील उद्यान पर्यवेक्षक नितीन राठोड, रुपेश चित्रुक सहाय्यक उद्यान पर्यवेक्षक वैभव ठाकरे यांचे या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.