बिगरपरवाना गावठी पिस्टल जवळ बाळगणऱ्या इसमास जेरबंद करण्यास शिरोळ पोलीसांना यश

शिरोळ प्रतिनिधी
दिनांक ११/०२/२०२५ रोजी रात्री पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गायकवाड यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, इसम नामे अमोल खडके, रा. शिरोळ याचेकडे विनापरवाना गावठी पिस्टल असून तो ते स्वतः जवळ बाळगतो. आज तो सदर गावठी पिस्टल एका इसमास दाखवून विक्री करण्यासाठी शिरोळ गावचे हददीत घालवाड फाटा येथे येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत कळविले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला, पो. हे. कॉ. १०११ पटेल, पो. कॉ. ४९९ शेख, पो. कॉ. ८९९ खरात, पो. कॉ. १६२१ ठोंबरे, पो. हे. कॉ. ६११ मडीवाळ यांनी शिरोळ गावी घालवाड फाटा जावून छापा कारवाई केली त्यावेळी इसम नामे अमोल शंकर खडके, वय २८ वर्षे, रा. खडके मळा, सरकारी आय टी आय जवळ, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर याचे कमरेला पॅन्टमध्ये खूपसलेली गावठी पिस्टल मिळून आली. सदर गावठी पिस्टल बाबत त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्याचेकडे हत्यार परवाना आहे का याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याचेकडे मिळून आलेले गावठी पिस्टल जप्त करुन सदर इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याचेविरुध्द शिरोळ पोलीस ठाणे गु. र. नं. ५४/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आजरोजी आरोपीत अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, जयसिंगपूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक १५/०२/२०२५ रोजी अखेर पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला हे करीत आहेत.