बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचा गौरव व प्रजात्ताक दिन साजरा

चिखली (प्रतिनिधी):-- बोधिसत्व प्रतिष्ठान संचालित राजर्षी शाहू महाराज विद्यालयांमध्ये प्रजात्ताक दिन अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष गोकुळ गायकवाड , सचिव लहू कांबळे तर अतिथी म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश मधुकर नेवाळे माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे, एपीआय राम गोमारे, हवालदार विनोद होनमाने, अलका सुतार, दामिनी पथकातील सुजाता शिंदे,संस्थेचे सचिव लहू कांबळे,संचालिका नंदा कांबळे, उपाध्यक्ष अंकुश कांबळे, सल्लागार सीए प्रा. दत्तात्रय खुणे,सीए पुष्पराज संघवी, विष्णू गायकवाड पोपट आरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी संचलनाच्या माध्यमातून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.याप्रसंगी मुख्याध्यापक बाबाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सल्लागार सीए प्रा. खुणे यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या बॅच मधील प्रथम क्रमांकाची मानकरी प्रतीक्षा पुजारी ,द्वितीय क्रमांकाची मानकरी प्रतीक्षा शिवशरण, तृतीय क्रमांक मिळवणारा यश जाधव व गणित विषयात 95 गुण मिळवून प्रथम येणारा प्रतीक बेरगळ यांचा प्रा. खुणे यांनी रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. विद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या गीत गायन स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा , चित्रकला स्पर्धा ,नृत्य स्पर्धा ,पाककला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा , निबंध लेखन स्पर्धा , सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सूत्रसंचालन स्वाती पाटील , जितेंद्र सूर्यवंशी व आभार पूनम तारख यांनी केले