दोन कारवायांमध्ये ८४ लाखांचे अंमली पदार्थ जप्त ४० किलो गांजा, ओजीकुश गांजा तसेच कोकेन सह महागड्या कार जप्त

पुणे प्रतिनिधी :- पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा यांच्या सुचनेप्रमाणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी पथकांनी दि.२३/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम व स्टाफ असे कोरेगावपार्क पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार संदिप शिर्के यांना मिळालेले बातमीवरुन क्लोअर गार्डन सोसायटी, बिल्डींग नं.बी-३, नेलर रोड, कोरेगावपार्क येथे इसम नामे १) प्रणव नवीन रामनानी, वय १९ वर्षे, रा. बंडगार्डन पुणे २) गौरव मनोज दोडेजा, वय १९ वर्षे, रा. कोरेगाव पार्क पुणे यांच्या ताब्यात एकुण ६७,०८,१००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ०२ ग्रॅम ७८ मि.ग्रॅम कोकेन तसेच १३६ ग्रॅम ६४ मि.ग्रॅम ओजीकुश गांजा हा अंमली पदार्थ तसेच ते विक्री करीता आरोपी वापरत असलेल्या मिनी कुपर व ग्रैंड व्हीटारा या महागड्या कार तसेब दोन इलेक्ट्री वजन काटे व चार मोबाईल संच असा ऐवज जप्त करून त्यांचे विरुध्द कोरेगावपार्क पोस्टे गु.र.नं.१२/२०२५, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८(क), २० (ब) (ii) (अ),२१ (अ), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दि.२४/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे जहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन नायकवाड व स्टाफ असे लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बातमीवरुन लोणकर क्स्ती ज्ञानाई बंगल्यासमोरील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी लोणीकाळभोर, पुणे येथे इसम नामे १) भरतकुमार दानाजी राजपुरोहीत, वय ३५ वर्षे, २) आशुसिंग गुमानसिंग दोघे रा. जि.जालोर राज्य-राजस्थान यांच्या ताब्यात एकुण १६,६७,८००/- रु.कि.चा ऐवज त्यामध्ये ४० किलो ३९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच इतर दैवज जप्त करून त्याचे विरुध्द लोणीकाळभोर पोस्टे गु.र.नं.४७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरवी कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.१, श्री.गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक१, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर कील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनिल नागलोट, प्रदिप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख, नुतन वारे, यांनी केली आहे.