स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधुन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद.

पुणे प्रतिनिधी :- स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील स्वारगेट एस टी स्टैंड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथे चोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने आम्ही स्वतः युवराज नांद्रे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, स्वारगेट पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पो. हवा.२६८४ अनुबा मोराळे पोलीस शिपाई सुजय पवार, दिपक खेदाड, फिरोज शेख, व हनुमंत दुधे यांना सुचना देवुन सदर भागात सकाळी गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन दि.२२/०१/२०२५ रोजी सकाळी ०८:०० वा चे सुमारास सदर पथक गस्तीवर असताना एक इसम स्वारगेट पी एम पी एम एल बस स्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयीत रित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आला त्याचे हालचालीवरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यास हटकले असता तो पळून जावु लागल्याने त्यास स्टाफचे मदतिने जागीच ताब्यात घेवुन त्यास त्यांनी त्यांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सतिश ज्ञानेश्वर शिरोळे वय ३२ वर्षे रा. फिरस्ता (पुणे स्टेशन व स्वारगेट बस स्टेंड परीसर) मुळ गाव मु पो दहीटणे ता दौंड जि पुणे असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे ओळखपत्र मागितले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यावेळी त्याचे ताब्यात एक विवो कंपनीचा, एक रेडमी कंपनीचा व एक ओपो कंपनीचा मोबाईल असे तिन मोबाईल मिळून आले. सदर मोबाईल फोनबाबत त्यास विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यास अधिक चौकशीकामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणुन त्यास विश्वसात घेवुन त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, मागिल महीन्यात सकाळचे वेळी स्वारगेट पी एम टी बस स्टॉप येथे बसमध्ये चढत असलेल्या एका महीलेचा विवो कंपनीचा मोबाईल गर्दीचा फायदा घेवून चोरला आहे. तसेच एक रेडमी कंपनीचा व एक ओपो कंपनीचा मोबाईल पुणे स्टेशन परीसरात चोरी केले आहेत. असे आम्हास सांगितले त्यानंतर आम्ही आकाशी रंगाचे व्ही २७ मॉडेल असलेला विवो कंपनीचा मोबाईल फोनबाबत स्वारगेट पोलीस ठाण्याकडील गुन्हे अभिलेख पडताळुन अधिक माहीती घेतली असता सदर मोबाईल फोनबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गु.र.नं. २७/२०२५, भा. न्या. सं २०२३ चे कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल असल्याची माहीती प्राप्त झाली. सदर गुन्हयांमध्ये आरोपीस अटक करुन त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने पुणे स्टेशन व स्वारगेट एसटी स्टॅन्ड परिसरातुन चोरी केलेले मोबाईल फोन हे त्याचे ओळखीचा मोबाईल दुकानदार नामे मोहम्मद शाहिद इलियास अन्सारी वय ३४ वर्षे धंदा हसना एंटरप्रायजेस मोबाईल शॉपी रा. लेन नं ०५, अल्ला हु अकबर बिल्डींग फ्लॅट नं ३०२, अशरफनगर, कोंढवा, पुणे यास विक्री केल्याचे सांगितल्याने त्याचे निवेदनावरुन सदर मोबाईल दुकानदार यांचेकडुन एकुण ७,४५,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपन्यांचे एकुण ४३ मोबाईल फोन व सॉफ्टवेअर मारणेकामी वापरलेला एक लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच अटक आरोपी सतिश शिरोळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचे चोरीचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार अनुबा मोराळे स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेश कुमार सों, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा सो. सह-आयुक्त साो, पुणे शहर, मा.श्री. प्रविणकुमार पाटील साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- २, पुणे शहर, मा. राहुल आवारे सो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. युवराज नांद्रे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा. २६८४ अनुबा मोराळे, पो.हवा.६५४४ सचिन तनपुरे, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं ९९६३ दिपक खंदाड, पो/अं ७८९९ हर्षल शिंदे, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं २१९० हनुमंत दुधे, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ८२३७ प्रशांत टोणपे, पो/अं १०१४७ संदीप घुले, यांनी एकत्र मिळुन केली आहे.