भाजपा तर्फे 31 जानेवारी पर्यंत सदस्य नोंदणी अभियान - आमदार योगेश सागर

भाजपा तर्फे 31 जानेवारी पर्यंत सदस्य नोंदणी अभियान - आमदार योगेश सागर

(मुंबई प्रतिनिधी )
भारतीय जनता पार्टी  सदस्य नोंदणी अभियान राज्यभरात दिनांक 1 जानेवारी ते 20 जानेवारी 2025 पर्यंत निश्चित केले होते या सदस्य नोंदणीस राज्यभर मिळत असलेला उत्तम प्रतिसाद पाहता भाजपा तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार सदस्य नोंदणीचा कालावधी दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे. 
दिनांक 31 जानेवारी पर्यंत सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे या सदस्य नोंदणी अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा तर्फे आमदार योगेश सागर यांनी केले आहे भाजपाचे सात मोर्चे आणि 32 आघाड्या आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांवर सदस्य नोंदणीची जबाबदारी आहे तसेच प्रत्येक पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनाही सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे राज्यभरात दीड कोटी सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह जास्तीची ही सदस्य नोंदणी करण्याचा प्रयत्न राहणार आहे असे योगेश सागर यांनी सांगितले विभागातील प्रत्येक बुथवर सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट असून यात चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकांमध्ये संधी मिळणार आहे काम सिद्ध करण्याची एक चांगली संधी कार्यकर्त्यांना असून अभियान राज्यभरात तसेच घरोघरी पोहोचावे असे आव्हानही त्यांनी केले आहे सदस्य नोंदणीसाठी ८८००००२०२४ या क्रमांकावर डायल केल्यास या क्रमांकावर लिंक येणार आहे या लिंक मध्ये आवश्यक ती माहिती भरल्यास सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मुंबईतील चारकोप विधानसभा कांदिवली पश्चिम विभागातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी दिनांक 31 जानेवारी पर्यंत सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे आव्हानही यांनी केले आहे.