बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वर्धा जिल्हाध्यक्ष पदी कमलेश कामडी यांची निवड.
वर्धा : बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वर्धा शाखेचे उदघाटन काल 22/01/2025 ला पुलगाव येथे सिद्धार्थ डोईफोडे यांच्या घरी करण्यात आले.या उदघाट्नाला प्रमुख अतिथी म्हणून बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन चे प्रमुख सिद्धार्थ सोमन व रोकडे साहेब उपस्थित होते.या प्रसंगी कमलेश कामडी यांची बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली,तसेच संघटनेचे महासचिव म्हणून अजय रामचंद्रराव घंगारे यांची नियुक्ती करण्यात आली.जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संजय हाडके,प्रवक्ते म्हणून वसंत मुरारकर,सचिव प्रमोद राऊत,सहसचिव कुणाल देठे,कोशाध्यक्ष प्रमोद नगराळे,देवळी तालुका प्रभारी राजपाल पाटील व मारगदर्शक म्हनुन् नारायण बोरकर बहुजन नियुक्ती करण्यात आली.बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया च्या वर्धा शाखा उदघाट्नाला अनेक कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.सर्व नियुक्त पदाधिकारी व उपस्थितांचे आयोजक सिद्धार्थ डोईफोडे यांनी आभार मानले.