महापालिका शाळांमधील Cctv यंत्रणेंचे नुतनीकरण करणे, यासह विविध विकासकामांना स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

पिंपरी :-पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रानराई महोत्सव व २८ वे फुले, फळे, भाजीपाला बागा वृक्षारोपण स्पर्धा व प्रदर्शन आयोजन करण्यासाठी तसेच ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या जागेत मैलाशुद्धीकरण प्रकल्प बांधणे या कामाची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.