महापालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

महापालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

पिंपरी चिंचवड

जल, जंगल,नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच पर्यावरण रक्षण त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणारे थोर समाजसुधारक संत सेवालाल महाराजांनी महिलांसह वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करण्याची शिकवण दिली. भेदभाव करू नये तसेच संकटांचा निर्भयपणे सामना करावा असे देखील त्यांनी सांगितले. त्यांच्या सेवाभावी विचारांचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.
अभिवादन वादन प्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक, उपअभियंता संजय जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी विनोद पवार यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रामराव महाराज राठोड, राजकुमार चव्हाण, पवन जाधव, दिलीप आडे,  सिताराम राठोड, रवी राठोड, बाबाजी राठोड, अमोल पवार,नितिन चव्हाण,रमेश राठोड, विनोद चव्हाण, विजय राठोड तसेच विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.