माळरानावर उंबर (औदुंबर) बहरला.

माळरानावर उंबर (औदुंबर) बहरला.
झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 
 
औदुंबर हे सुप्रसिद्ध ठिकाण सध्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील प्रसिद्ध बालकवी ( त्र्यंबक बापुजी ठोंबरे) यांनी याच ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात राहून कविता रचलेले ठिकाण आजही सर्व साहित्यिकांना प्रेरणादायी आहे.आदिवासी डोंगराळ भागात तर वेगवेगळ्या लोकगीतांतून उंबराचा उल्लेख येत आहे. 
      " उंबर फुले उंबर फुले 
         सळ मदाने राती"
 हे आदिवासी भागातील तूर नृत्यावर सादर करण्यात येणारे लोकगीत पूर्वीपासून प्रसिद्ध आहे या गीतात उंबर या जंगली फळाचे वर्णन केले आहे.  तारतार तारला सारी रात जागला पण हाती नाय लागला हे कोडेही प्रसिद्ध आहे त्याचे उत्तर उंबराचे फुल हे आहे.उंबराची फुलं रात्री फुलतात अन् रातसून गळून पडतात.असे लोकतत्वही रूढ झाले आहे.उंबर हा बारमाही सदाहरित वृक्ष उंबराला फळे कोणत्याही ऋतूत येतात. अशावेळी उंबराची लाल फळं खाण्यासाठी झाडावर रानमांजर ( मोहट) येतात बऱ्याचवेळा उंबराच्या झाडावर खोडावर मोहटाच्या पावलांची नखं रूतलेली दिसतात.
आदिवासी डोंगराळ भागात लग्न विधीत उंबराची डहाळी घागरीत ठेवतात मग धवळं गाणं गायलं जाते.
            उंबरी पोकळी 
        धींडरी भाकरी ये
          नका रडु आत्याजी
        मायही बावरी ये 
      उंबराची डहाळी मंडपी सजली ये
अशी अतिशयोक्ती अलंकारांची गीत आदिवासी भागातील महिला लग्न प्रसंगी गात असतात.उंबराचे झाड हे पाणीदार असते झाड तोडल्यावर कमीत कमी सात ते आठ दिवस झाड्याच्या खोडातून पाणी निघून जाते ते आयुवेर्दिक मानले जाते. आदिवासी डोंगराळ भागात किंवा शहराला लागून असलेल्या शेतात मळ्यात शेंदूर फासलेली स्थानक आढळतात. ही झाड जास्तीत जास्त तलावाच्या काठावर, पाणवठ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात याला जास्त चिक निघत असल्याने पक्षी पकडण्यासाठी चिखाटीसाठी वापर केला जातो.उंबराच्या पाच लहान काड्या आदिवासी भागात वास्तुशांतीच्या ( घरभरणी ) पुजेसाठी वापरतात ह्या झाडावर लाल मुंग्या राहतात रानात गुराखी शेळ्या, मेंढ्या चारायला घेऊन जातात तेव्हा शेळ्या,मेंढ्या उंबराची लाल फळं  खाण्यासाठी लांबून धाऊन जातात अशी माहिती यावल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक तथा आदिवासी संशोधक सुभाष कामडी यांनी दिली आहे.