जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा आरोग्य विभागाचा आढावा
  प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा व लसींच्या पुरवठ्याची घेतली माहिती 
 
हिंगोली, (जिमाका) दि.१३:  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा बैठकीत घेतला. 
 
प्रामुख्याने संजीवनी अभियानांतर्गत कर्करोग संशयित महिलांची 30 मे पर्यंत पूर्ण तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
 
प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र एनकॉस NQAS करणे,
 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड डॉ. काळे, डॉ. कल्पना सुनतकुरे, डॉ अनुराधा दहिफळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी व सर्व तालुका आरोग्य अधिकारी या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुविधा, औषधसाठा, लस पुरवठा आणि विविध उपचार सेवा यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.
 
बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच एनएचएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता यांनी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवक यांची संख्या, त्यांची उपस्थिती आणि उपचार सेवा तपासण्याचे निर्देश दिले.
 
प्राथमिक आरोग्य केंद्रात सुधारणा करण्याचे निर्देश
 
जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत अद्ययावत सुविधांचा अभाव आहे. यावर चर्चा करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, “ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा,प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी 30 प्रसूती झाल्या पाहिजेत अशा सूचना देण्यात आल्या, प्राथमिक आरोग्यंद्राच्या ठिकाणी EDD ट्रेकिंग झाली पाहिजे बोर्ड लावण्यात यावा, खाजगी दवाखान्यात मध्ये आलेल्या गरोदर मातेच्या आरसीएच नंबर शासकीय संस्थेमधून रजिस्ट्रेशन करण्यात यावा, डिलिव्हरीचे रेफरल होता कामा नये रेफरल एडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, आरसीएस पोर्टल सह सर्व पोर्टल अपडेट करण्याच्या सूचना देण्यात आल्या, चाचणी यंत्रणा आणि औषधांचा नियमित साठा असणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले.
 
औषधसाठा आणि लसींच्या पुरवठ्याचा आढावा
 
बैठकीत TB क्षय रोग, कुष्ठरोग, एनसीडी, माता बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, मलेरिया, डेंग्यू, आणि कुपोषणविरोधी औषधांचा साठा तसेच लसीकरण मोहिमेसाठी आवश्यक लसी – जसे की बीसीजी, पोलिओ, DPT, MR – यांचा पुरवठा नियमित आहे का याची माहिती घेण्यात आली. काही तालुक्यांमध्ये औषधसाठ्याचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले असून लवकरात लवकर तेथे पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले.
 
एनएचएमअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तपासली
 
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मातृमृत्यू दर, बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यात आली. जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी गर्भवती महिलांसाठी ‘जननी शिशु सुरक्षा योजना’ व ‘महिला आरोग्य शिबिरां’च्या माध्यमातून प्रभावी सेवा देण्याचा आग्रह धरला.
 
आरोग्य जनजागृतीसाठी सूचना
 
शहरी व ग्रामीण भागात रोगप्रसार रोखण्यासाठी  जनजागृती मोहिमा, पथनाट्य, माहितीपत्रके व आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, असेही त्यांना सांगितले.