भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल लोहेगाव,पुणे चा इयत्ता 10वी चा 100% निकाल.

पुणे प्रतिनिधी कविता सवाखंडे)
मंगळवार, दि.13 मे 2025 रोजी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे(सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यामध्ये भारतीय विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल,लोहेगाव पुणे च्या विद्यार्थ्यांनी अत्यंत घवघवीत यश प्राप्त करून शाळेच्या नावलौकिकात भर घातली. शाळेचा एकूण 100% निकाल लागला. यामध्ये यजत राजेंद्र चव्हाण याने 98.4% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला. भव्य हरिश्चंद्र कर्नाटका ह्याने 97.0% गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळवला. भार्गवी राजेश गोरे हिने 96.60% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळवला. तेजस माने 96.20 गुण प्राप्त करून चौथा क्रमांक मिळवला. तर शोभना प्रियदर्शी हिने 96.20% गुण प्राप्त करून चौथा क्रमांक मिळवला. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरी व मेहनती बद्दल मुख्याध्यापक जॉर्ज.पी.एस.सर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. या आनंदाच्या प्रसंगी मुख्याध्यापक जॉर्ज.पी.एस.सर यांनी भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष मा. विजयमाला कदम मॅडम मा. एम.डी. कदम सर (संचालक) मा. शितल टाक मॅडम (सहाय्यक संचालिका) यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. तर सर्व शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले. व पालकांनीf दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल शाळेमध्ये अत्यंत उत्साही व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.