आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न पुस्तकाचे उद्या मुंबईत प्रकाशन

आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न पुस्तकाचे उद्या मुंबईत प्रकाशन
मुंबई : प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आणि राजेंद्र पातोडे लिखित "आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या (14 मे) सायंकाळी 6 वाजता मुंबईतील आंबेडकर भवन, दादर (इ) येथे होणार आहे.
 
या प्रकाशन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रबुद्ध भारतचे संपादक ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक सोनोने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, प्रबुद्ध भारतच्या कार्यकारी संचालक आणि वंचितच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, ज्येष्ठ फुले- आंबेडकरी विचारवंत शांताराम पंदेरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक आणि इतिहास संशोधक प्रा. उमेश बगाडे,  भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष यू. जी. बोराडे, ज्येष्ठ पत्रकार संपादक महेश म्हात्रे, लोकमत ऑनलाइनचे संपादक आशिष जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.  
 
स्थळ: आंबेडकर भवन, दादर, मुंबई
 
वेळ: 14 मे 2025, सायंकाळी 6 वाजता