कर्जमुक्तीचा आनंद — महिलांच्या चेहऱ्यावर उमटला आत्मविश्वासाचा प्रकाश
पुणे प्रतिनिधी : उषा लोखंडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजित नागरिक पतसंस्था महिला बचत गटाच्या कर्जदार भगिनींसाठी आयोजित कर्जमुक्ती प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला.
या प्रसंगी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि समाधान पाहून संपूर्ण सभागृह भारावून गेले.
या उपक्रमामुळे अनेक महिलांना आर्थिक दिलासा मिळून त्यांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळला. आर्थिक स्वावलंबनाकडे नेणारे हे पाऊल महिलांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यशस्वी उपक्रमामागे वसंत तात्या मोरे यांचे मोलाचे सहकार्य आणि अमित भाऊंचे समर्पित प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा मार्ग मिळाला. सत्तेवर नसतानाही समाजासाठी झटणे हीच खरी समाजसेवा आहे, हे वसंत तात्यासाहेब मोरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.
त्यांच्या समाजाभिमुख कार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना नव्या ऊर्जेची प्रेरणा मिळाली आहे.
कार्यक्रमात पोवाडा सादर करणारे देवानंद माळी यांनी आपल्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरण रंगवले आणि उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
महिला भगिनींनी भावनिक शब्दांत आपली कृतज्ञता व्यक्त केली — वसंत तात्यासाहेब मोरे, खरंच आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी आहोत.
तुमचं हे कार्य आमच्या आयुष्यात नवी दिशा देणारं ठरलं आहे.
महिलांच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आमच्यासाठी प्रेरणेचा दीप आहेत.”
सोहळ्याचा समारोप महिला प्रतिनिधींच्या वतीने वसंत तात्या मोरे आणि अमित भाऊंप्रती मनःपूर्वक आभार प्रदर्शनाने झाला.
संपूर्ण कार्यक्रम कृतज्ञता, प्रेरणा आणि एकतेच्या भावनेने ओथंबून गेला.