शासनाचा सेवा पंधरवडा – सर्वसामान्य नागरिकांना समृद्ध करण्याचा उपक्रम – आमदार विनोद अग्रवाल

खमारीतून सेवा पंधरवड्याची सुरुवात, शिबिरांच्या माध्यमातून होणार नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण
गोंदिया/१४ सप्टेंबर
राष्ट्रनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबरपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिन २ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा साजरा करणार आहे. या सेवा पंधरवड्याची सुरुवात आज १७ सप्टेंबर रोजी ग्राम खमारी येथील ग्रामपंचायत प्रांगणात भव्य कार्यक्रमाने करण्यात आली.
या सेवा पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या विविध विषयांशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्यासाठी या अभियानाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
आपल्या भाषणात आमदार अग्रवाल म्हणाले, अनेक गावांमध्ये जमिनीच्या पट्ट्यांचा प्रश्न गंभीर अवस्थेत निर्माण झाला होता. परंतु आम्ही शासनस्तरावर पत्रव्यवहार करून, मंत्रालयीन स्तरावर बैठका घेऊन सरकारचे लक्ष वेधले आणि सरकारने हे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. आता शासनाच्या या उपक्रमामुळे सर्व अतिक्रमणधारकांना जमिनीच्या पट्ट्याचा हक्क मिळणार आहे. झुडपी जंगल व वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांनाही त्यांनी दिलासा दिला की, त्यांचा प्रश्नही लवकरच सोडवला जाईल आणि त्यांनाही जमिनीचा हक्क मिळेल.
आमदार अग्रवाल म्हणाले, शासन आणि प्रशासन एकत्र काम करत आहे, त्यामुळेच आपण विकासाच्या दिशेने पुढे जात आहोत. मी शासन व प्रशासनाचे आभार मानतो. त्यांनी सांगितले की, आज शेती मार्गांची बांधणी होत असल्याने जमिनींच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे शेतकरी सबळ आणि समृद्ध होत आहे.
आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, हा सेवा पंधरवडा तीन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात पांदन रस्ता अभियान, दुसऱ्या टप्प्यात घरकुल सर्वांसाठी योजनेअंतर्गत २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना पट्ट्यांचे वाटप व तिसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अभिनव उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांची कामे युद्धपातळीवर करण्याचा प्रयत्न होईल, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गोंदिया जिल्हा विकासाच्या मार्गावर वेगाने आगेकूच करत आहे. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे की गोंदिया तालुक्यात विकासकामे वेगाने होत आहेत. गोंदियात २०११ पूर्वीचे १३ हजार अतिक्रमणधारकांना जमिनीचा पट्टा मिळत आहे. माझा प्रयत्न नेहमीच असा राहिला आहे की प्रत्येक काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
कलेक्टर नायर म्हणाले की, गावांमध्ये रस्त्यांबाबत अधिक वाद निर्माण होतात. हे प्रश्न आता या अभियानाच्या माध्यमातून शासन-प्रशासन पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न होईल.
या कार्यक्रमाला आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी प्रजीत नायर, एसडीओ चंद्रभान खंडाईत, तहसीलदार शमशेर पठाण, उपतहसीलदार श्रीकांत कांबळे, बीडीओ आनंदराव पिंगळे, सरपंच खमारी होमेन्द्र भांडारकर, पं.स. सदस्य कनीराम तावडे, उपसरपंच लीलाबाई उके, ग्रामपंचायत सचिव श्री. खाडे, अजय खानोरकर, ज्ञानेश्वर धोटे, मनोज साखरे, गोले जी तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
[5:16 PM, 9/17/2025] Rupali Ks: __