सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी - ना. चंद्रकांतदादा पाटील.

सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी - ना. चंद्रकांतदादा पाटील.
सत्तेचा वापर लोक कल्याणासाठी - ना. चंद्रकांतदादा पाटील.
ग्लोबल ग्रूप तर्फे वाघजाई देवीला 5 किलो चांदीचे दागिने समर्पित - संदीप खर्डेकर
 
 सत्तेचा किंवा मिळालेल्या पदाचा वापर हा लोककल्याणासाठी केला पाहिजे या भावनेने मी राजकारणात कार्यरत असतो अशी भावना  ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.मला कोथरूडकरांनी विक्रमी मतांनी विजयी केले आणि माझ्यावर विश्वास दाखविला याबद्दल मी कृतज्ञ तर आहेच पण कोथरूड मतदारसंघातीलच नव्हे तर पुण्यातील सर्व समस्या सोडविण्यासाठी मी कटीबद्ध असल्याचेही मा. ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
ग्लोबल ग्रूप च्या वतीने संचालक श्री. संजीव अरोरा यांनी क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान संचालित कोथरूड नवरात्र उत्सवाच्या श्री वाघजाई देवीस 5 किलो चांदीचे दागिने समर्पित करताना मा. चंद्रकांतदादा व संजीव अरोरा यांचा सत्कार करण्यात आला,यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ह्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी ग्लोबल ग्रुपचे संचालक संजीव अरोरा,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,कै.विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके, विश्वस्त उमेश भेलके, सौ. श्वेताली भेलके,सौ. अक्षदा भेलके, मा. नगरसेविका वासंती जाधव, शहराचे भाजपा उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,शहर उपाध्यक्ष मंदार बलकवडे, कामगार आघाडी चे राज्य सरचिटणीस बाळासाहेब टेमकर,नवनाथ जाधव,उद्योजक सारंग राडकर, अक्षय मोरे, सुरेश जपे, संदीप मोकाटे, किरण उभे यासह समीर ताडे,गजानन माजिरे, मोहित भेलके व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन नवरात्र उत्सव साजरा करत असतानाच वर्षभर समजपयोगी उपक्रम राबवत असते व संस्थेस मिळालेला सर्व निधी गरजू व्यक्तींच्या साठी मदतकार्यात खर्च करत असते असे संदीप खर्डेकर म्हणाले.मात्र हे करत असताना देवीच्या साज शृंगाराकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही असेही संदीप खर्डेकर म्हणाले. मात्र ग्लोबल ग्रूप चे संचालक आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे हितचिंतक संजीव अरोरा यांच्या लक्षात ही बाब आली व त्यांनी देवीच्या चरणी 5 किलो चांदीचे दागिने समर्पित केले व त्यायोगे देवीच्या सुबक मूर्तीचे तेज शतपटीने वाढल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
संजीव आरोरांसारखे उद्योगपती जे आपल्या कडे असलेले अतिरिक्त पैसे हे समाजासाठी खर्च करतात हे कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी संजीव अरोरा यांना पुणेरी पगडी, शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. भविष्यात ही आपण समाजोपयोगी कार्य करत राहू असे संजीव अरोरा म्हणाले.
यावेळी दागिने घडविणारे कलाकार नितीन कर्डे यांना ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले तर वाढदिवसाच्या निमित्ताने उद्योगपती सारंग राडकर व मा. नगरसेविका वासंती जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
देवीच्या आरतीने ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
आपला,