खिर्डी/प्रतिनिधी _दि.11
वढोदा प्र सावदा येथील सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन आज शिक्षणाचे आराध्य दैवत महात्मा महात्मा फुले जयंती निमित्त करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून रावेर तालुका तहसीलदार बी.ए कापसे,नायब तहसीलदार संजय तायडे, सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, शाळेच्या चेअरमन अश्विनी तायडे, सावदा मंडळ अधिकारी प्रवीण वानखेडे, सावदा तलाठी रशीद तडवी, वढोदा ग्रामपंचायतचे सरपंच नंदकिशोर सोनवणे, तलाठी निलेश पाटील, सकाळचे प्रतिनिधी प्रवीण पाटील हॉटेल महिंद्राचे संचालक राहुल चौधरी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांचे वडील भागवत तायडे आणि मातोश्री सुमन तायडे यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले. सुरुवातीला भंते दीपंकर यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महामानवांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना तहसीलदार कापसे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित समाजाला शिक्षणाची प्रेरणा आणि दिशा दिली. तोच आदर्श घेऊन सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल ही संस्था तळागाळातील गोरगरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत आहे. गरीब घरातील मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम सर्चलाईट इंग्लिश मीडियम स्कूल करीत आहे. नवीन इमारत मुळे विद्यार्थ्यांची सोय होणार आहे.
तर विशाल पाटील बोलताना म्हणाले सावदा,पिंपरुळ, आदी.ग्रामीण भागातील या पंचक्रोशीतील कष्टकरी मनमजुरी करणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी ही संस्था अनेक वर्षापासून सुरू आहे.आता नवीन इमारत झाली की मुलांच्या बसण्याची उत्तम सोय होईल. सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष अनोमदर्शी तायडे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक नितीन झाल्टे यांनी केले.यावेळी रावेर तहसीलचे सचिन पाटील, राजू सवर्णे, उमेश गाढे, विशाल जवरे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक विजय अवसरमल, भारतीय बौद्ध महासभेचे रावेर तालुका अध्यक्ष विजय भोसले, राजेंद्र अटकाळे, सावदा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष नंदा लोखंडे, सामाजिक कार्यकर्त्या कामिनी तायडे, लक्ष्मी मेढे, सचिन झाल्टे, दीपक बडगे, दिलीप भालेराव, योगेश लोखंडे, आनंद तायडे, निलेश बावस्कर, प्रदीप बाऱ्हे, सागर बावस्कर, यांच्यासह असंख्य पालक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार संस्थेचे उपाध्यक्ष ऍड योगेश तायडे यांनी मानले.