स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथे शनिवारी रक्तदान शिबिर...

स्व.आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव येथे शनिवारी रक्तदान शिबिर...

चिंचवड :-चिंचवड विधानसभेचे स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा रुग्णसेवक संजय गायखे यांच्या वतीने शनिवारी (दि.१५ फेब्रुवारी) थेरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
थेरगाव येथील जय हनुमान शनीदेव मंदिर या ठिकाणी शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी आठ या वेळेत हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. चिंचवड विधानसभेचे आमदार तथा स्व. लक्ष्मण जगताप यांचे लहान बंधू आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात येणार आहे.
यासंदर्भात बोलताना आयोजक संजय गायखे म्हणाले की, स्व. आमदार लक्ष्मण जगताप हे खऱ्या अर्थाने या चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष होते. त्यांच्या कार्यकाळात चिंचवड विधानसभेचा विकास झाला. मात्र दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे ते आपल्यातून अचानक निघून गेले. त्यांनी नेहमी पक्षातील लहान आणि दुर्लक्षित कार्यकर्त्याला बळ देण्याचे आणि त्याला पुढे आणण्याचे काम केले. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही यापुढे दरवर्षी १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याचे, गायखे यांनी यावेळी सांगितले.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक स्टीलची पाण्याची बॉटल भेट स्वरूपात देण्यात येणार असून या शिबिरामध्ये स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान करावे असे आवाहनही, आयोजक संजय गायखे यांनी यावेळी केले.