स्वेरीच्या ‘एमबीए’ विभागाचा ‘पालक मेळावा’ संपन्न

पंढरपूर- ‘शिक्षण तर सगळीकडेच मिळते परंतु शिक्षणाबरोबर करिअर करण्यासाठी आवश्यक असलेली माणुसकी जपण्याचे संस्कार स्वेरीतून उत्तम प्रकारे मिळतात, ही बाब कौतुकास्पद आहे कारण या ठिकाणी अभ्यासाबरोबरच कठोर परिश्रम करण्यावर अधिक भर दिला जातो. कालांतराने त्याचे फळ विद्यार्थ्याच्या वार्षिक निकालांमधून मिळते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच बाहेरील जगाचे ज्ञान देखील स्वेरीतून मिळते. जागतिक बाजारपेठेत आपला दर्जा आणखी सुधारण्यासाठी बदलाची सुरवात ही स्वतःपासून करावी.’ असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. महादेव जेधे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘एमबीए’ अर्थात ‘मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ या विभागातर्फे आयोजिलेल्या ‘पालक मेळाव्या’त पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. जेधे हे मार्गदर्शन करत होते. यावेळी महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ. गायत्री भिंगारकर ह्या व्यासपीठावर उपस्थित होत्या. दिपप्रज्वलनानंतर विभागप्रमुख डॉ. कमल गलानी यांनी पालक मेळाव्याचे आयोजन करण्याचा हेतू सांगून एमबीए विभागाची संपूर्ण माहिती दिली. यामध्ये दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात घेण्यात येणारे विविध उपक्रम, महाविद्यालयातील सोई- सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालयातील उपलब्ध संदर्भ पुस्तके, शैक्षणिक उपक्रम, ट्रिपल पीई, इफेक्टिव्ह टीचिंग-लर्निंग स्कीम, डिजिटल मार्केटींगचे प्रात्यक्षिक व सेमिनार द्वारे दिले जाणारे प्रशिक्षण, महाविद्यालयाला मिळालेली विविध मानांकने, प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्राणायम, संबंधित विषयावर कार्यशाळा आदी माहिती विस्तृत स्वरूपात सांगितली. यावेळी पालकांच्या साक्षीने प्रथम व द्वितीय वर्षात गुणवंत व यशवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. वसतिगृह व्यवस्थापक डॉ.के.बी. पाटील म्हणाले की, ‘पाल्यांच्या जडणघडणीमध्ये पालकांचा महत्वाचा वाटा आहे त्यामुळे पाल्यांच्या प्रगतीसाठी पालकांसमवेत सुसंवाद व्हावा या हेतूने या ‘पालक सभे’मध्ये सर्व पालकांची उपस्थिती गरजेची असते. स्वेरीमध्ये विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून कार्य सुरु आहे हे सर्वश्रुत आहे. असे असताना पालकांनी देखील वेळोवेळी महाविद्यालयाशी व संबंधित विषयांच्या प्राध्यापकांशी संपर्क साधून पाल्याच्या प्रगती बाबत सातत्याने पाठपुरावा करावा. यामुळे पाल्य जागृत राहून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करेल. यासाठी आपल्या पाल्यांना भावनिक न घेता नियमित कॉलेज अटेंड करण्यास सहकार्य करावे.’ असे सांगून विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा असे आवाहन केले. प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. ए.ए. मोटे यांनी एमबीए च्या प्लेसमेंट विभागाची माहिती देवून गत वर्षापर्यंत प्लेसमेंट द्वारे विविध बँका आणि कंपन्यामध्ये उपलब्ध झालेल्या नोकरीच्या संधी, नोकरीत निवड करताना कंपनीकडून पहिल्या जाणाऱ्या बाबी, इंग्रजी संभाषण, आत्मविश्वास, बोलताना बॉडी लँग्वेज कशी असावी याबाबत माहिती दिली. एकूणच त्यांनी पाल्याच्या वाटचालीत पालकांची नेमकी काय भूमिका असावी हे स्पष्ट केले. यावेळी महिला पालक प्रतिनिधी सौ. गायत्री भिंगारकर यांच्यासह अनेक पालकांनी आपले विचार मांडले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या पालक सभेत जवळपास १०० पालक तसेच, स्वेरीच्या ‘एमबीए’ विभागातील डॉ. एन.एस. मगर, प्रा. अमाद अहमद, प्रा. एस.डी. सरीक, प्रा. पी.एस.मोरे यांच्यासह इतर प्राध्यापक, संभाजी वलटे उपस्थित होते. पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. के.पी. कौंडूभैरी यांनी केले तर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) च्या समन्वयिका डॉ. एम.एम. भोरे यांनी आभार मानले.