स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ‘क्षितिज २ के २५’ हा उपक्रम संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये मेसा तथा मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटस असोसिएशन आणि द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), कोलकाता स्टुडन्ट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात ‘क्षितिज २ के २५’ हा उपक्रम संपन्न झाला.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात मेसा समन्वयक प्रा. संजय मोरे यांनी ‘क्षितिज २ के २५’ या उपक्रमासंबंधी सविस्तर माहिती दिली. प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. के.बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय अनुदान मिळविण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या विविध योजना बाबत माहिती दिली. उदघाटनानंतर विद्यार्थ्यांनी कॅडवॉर पोस्टर प्रेझेंटेशन, टेक्नो क्वीज, कॅम्पस रिक्रूटमेंट प्रोग्राम अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धा सुरळीत व नियोजनबद्ध पार पडल्या. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या स्पर्धेत १८ हजार रुपयांची बक्षिसे स्पर्धकांना वितरीत करण्यात आली. यावेळी श्वेता सगरे, अथर्व जोशी, वरद निरगुडे, प्रणाली जाधव या सोलापूरवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत संयोजकाचे कौतुक केले. ‘क्षितिज २ के २५’ या उपक्रमासाठी कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. ए. पी. केने, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, आय.ई.आय. कोलकत्ता स्टूडंट चॅप्टरचे समन्वयक प्रा.डी. टी. काशीद, विद्यार्थी प्रमुख देवेश खरे, प्रणव पाटील व प्रतिक्षा चौधरी व कार्यक्रमासाठी आलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. ज्ञानेश्वरी मेटकरी व सोनाली कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर मकरंद कर्चे, प्रतिक शिंदे यांनी आभार मानले.