हिंजवडी :-हिंजवडी-माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे रेडिमिक्स डम्पर पलटी होऊन दोन तरुणींचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेडिमिक्सने भरलेला डंपर (एमएच 12/एक्सएल 5744) हिंजवडीकडून महाळुंगेच्या दिशेला चालला होता. वडजाईनगर कॉर्नर येथे वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो पलटी झाला. त्याचवेळी स्कूटरवरून चाललेल्या दोन तरुणींचा डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहचले असून, क्रेनच्या सहाय्याने रेडिमिक्स डंपर उचलून दोघींना बाहेर काढण्याचे आणि ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दोन्ही तरुणी आयटी अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, या दुचाकीवरून दोघी चालल्या होत्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.