ओन्ली.. वन देवेंद्रभाऊ.... गिरीधर साळुंखे यांची स्पष्ट प्रतिक्रिया

ओन्ली.. वन देवेंद्रभाऊ....  गिरीधर साळुंखे यांची स्पष्ट प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र अस्वस्थ होता…
राजीनाम्याच्या अफवा, विरोधकांचा आनंद, समर्थकांची चिंता!

पण देवेंद्रभाऊंनी पुन्हा एकदा सिद्ध केलं

(मुंबई प्रतिनिधी रूपाली बैसाणे ):देवेंद्रभाऊ कशाचे बनले आहेत समजत नाही. गेल्या आठ दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ होता.देवभाऊंचे  असंख्य चाहते, लाडक्या बहिणी आणि समर्थक यांच्या अस्वस्थतेला तर पारावार नव्हती. अनेक समर्थकांनी आधीच हातपाय गाळले होते. अनंत चतुर्दशीच्या आधी सरकारचं विसर्जन होणार,देवभाऊंचा राजीनामा घेणार, मग असला पक्ष काय कामाचा... अशा असंख्य निराशाजनक पोस्ट पडत होत्या. वातावरण स्फोटक होतं. कधी कुठे ठिणगी पडून भडका उडेल काय याची भीती होती. विरोधी गटात आसुरी आनंदाचं वातावरण होतं. 'आता फडणवीस कसे सुटतात बघू... झालात ना मुख्यमंत्री.. आता सोडवा हा गुंता..!' अशी भावना होती...
पण देवाभाऊंनी पूर्वीच सांगून ठेवलं होतं... ''चक्रव्यूहात कसं शिरायचं हे ही मला माहिती आहे आणि त्यातून बाहेर कसं पडायचं हे ही मी जाणतो..!"
काय अवस्था झाली असेल या माणसाची.. आमच्यासारखी लाखो कार्यकर्ते,समर्थक हवालदिल झाले होते,यांना तहान भूक झोप लागत तरी असेल का? 
 तरीही यांचे नित्य कार्यक्रम सुरळीत चालू होते.. लालबागच्या राजाला जाणं, पुणे दौरा, नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेणं... 
मनातल्या मनात एक प्रचंड वादळ घेऊन हे शांतपणे वावरत होते,..वादळात ही सदा घे पुढेच धाव तू.... हे संघ गीत प्रत्यक्षात उतरविले,आणि पडद्यामागे हा जबरदस्त तिढा सोडवण्याच्या हालचाली सुरु होत्या. तिकडे कोर्टाची प्रक्रियाही सुरूच होती. 
शिव्याशाप तर पाचवीला पुजलेले..! 
पण अशा अशक्यप्राय भासणाऱ्या अग्नीदिव्यातून देवाभाऊ....दरवेळी तावून सुलाखून बाहेर पडतात..हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
एक प्रामाणिक, सुसंस्कृत मुख्यमंत्री हकनाक बळी गेला नाही याचा अतिशय आनंद झाला...
आंदोलनाची सांगता यशस्वी होणं ही राज्याच्या दृष्टीनं अतिशय सकारात्मक गोष्ट आहे..
आज घरगुती गणपतींचे विसर्जन होत असताना राज्यासमोरील एका मोठ्या समस्येचंही विसर्जन झालं..यातून आपण तावून सुलाखून निघालात व अडचणीतून यशस्वी मार्ग काढलात त्यामुळे जनतेच्या मनात आपले आढळ स्थान निर्माण झाले आहे.
आंदोलकांचं,फडणवीस सरकारचं मनःपूर्वक अभिनंदन...आणि 
देवाभाऊ!..यांचे विशेष आभार
गिरीधर साळुंके 
कार्यवाह
विमुक्त भटके जातीजमाती विकास परिषद अखिल भारतीय 
मो.9324659275