भाजप मुंबईकडून स्व. मुकुंदराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण

भाजप मुंबईकडून स्व. मुकुंदराव कुलकर्णी यांना श्रद्धांजली अर्पण

मुंबई, दिनांक ३० जून २०२६

भारतीय जनता पक्ष मुंबईच्या वतीने दिनांक २९ जून २०२६ रोजी वसंतस्मृती कार्यालय, दादर येथे सायंकाळी ६.३० वाजता भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाचे माजी मंत्री तसेच ज्येष्ठ स्वयंसेवक स्वर्गीय मुकुंदराव कुलकर्णी यांच्या 'श्रद्धांजली सभे'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्व. मुकुंदराव कुलकर्णी यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

याप्रसंगी भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार मा. श्री. अमीत साटम, ज्येष्ठ नेते मा. श्री. राम नाईक, मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री मा. श्री. भाई गिरकर, आमदार मा. श्री. संजय उपाध्याय, आमदार मा. श्री. पराग अळवणी, आमदार मा. श्री. सुनील कर्जतकर, मा. श्री. रघुनाथ कुलकर्णी, मा. श्री. अरुण देव, मुंबई उपाध्यक्ष मा. श्री. अभिजीत सामंत यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान मुकुंदराव कुलकर्णी यांचे १७ जून २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते हे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत स्वयंसेवक होते. जनसंघाच्या काळापासून त्यांनी पक्षसंघटन बांधणीत तब्बल सहा दशके (६० वर्षे) निःस्वार्थपणे योगदान दिले. पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी कार्यकर्त्यांची पिढी घडवली. मुकुंदराव कुलकर्णी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळेच आज पक्ष टिकून आहे त्यामुळे भाजप मुंबईकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.