ठाणे महापालिकेतर्फे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन
ठाणे : माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि अतिरिक्त आयुक्त १ प्रशांत रोडे यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, प्रभारी उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तसेच आंबेघोसाळे येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपायुक्त जी. जी. गोदेपुरे आणि दीपक झिंजाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.